Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वंदे मातरम : या प्रकारे जन्माला आला स्वातंत्र्यदिनाचा महामंत्र

Webdunia
सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (12:30 IST)
वंदे मातरमचे गायन फक्त राष्ट्रगीताचे गायन नसून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या संघर्षाशी नाळ जोडण्याचे एक माध्यम आहे. मात्र स्वतंत्र भारतात 'वंदे मातरम्' भोवती नाहक वादांची वादळे घोंघावत राहिली आहेत.
 
लेखक व प्रशासकीय अधिकारी मनोजकुमार श्रीवास्तव यांनी 'वंदे मातरम्' पुस्तकातून या संबंधित गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचीच ही माहिती. काही स्वयंघोषित विद्वान वंदे मातरमचे लेखक बंकिमचंद्र यांना द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्ताचे जनक ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रुसेल्समध्ये 2004 दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संमेलनात भारतीय प्रतिनिधी मंडळाने आपल्या पेपरमध्ये हिंदू राष्ट्र सिद्धान्ताचे सर्वप्रथम स्पष्ट प्रतिपादन बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी बंगाली भाषेतील कादंबरी आनंदमठमध्ये केल्याचे मत ठासून मांडले.
 
बंकिमचा शब्दशः अर्थ धूर्त असा होतो. बंगदर्शनमध्ये 1874 साली बंगाल फक्त हिंदूचे नाही, असे लिहिणार्‍या बंकिमचंद्रांविषयी उगाचच अपप्रचार करण्यात येत आहे. बंकिमचंद्र मुस्लिमविरोधी असते तर त्यांनी आपल्या 'सीताराम' कादंबरीतल्या पात्राच्या तोंडी, 'आपण हिंदू-मुस्लिमात भेद केल्यास दोन्ही समुदाय वास्तव्य करत असलेल्या या भूमीवर आपले राज्य सुरक्षित ठेवू शकणार नाहीस. तुझ्या कल्पनेतील धर्माचे राज्य अनियंत्रित व अविवेकी शासकाच्या हाती जाईल.' असे वाक्य दिले आहे याची नोंद घेतली पाहिजे.
 
वंदे मातरम् ब्रिटीशविरोधी नव्हते काय? ह्या मुद्द्यावरही मतभेद जाणवतात. आपले नव बुद्धिमंत हे गीत ब्रिटीशविरोधी नसून ‍मुस्लिमविरोधी असल्याचे मानतात. मात्र, ते आपल्याविरोधातच असल्याबाबत इंग्रजांना यत्किंचितही शंका नव्हती. हे एका परकियांनी सुरू केलेल्या दडपशाहीविरोधात एका भयंकर देवीने सातत्याने केलेले आव्हान आहे', असे सर व्हॅलेंटाइन चिरोल यांनी 'इंडियन अनरेस्ट' या पुस्तकात तसा उल्लेख केला आहे. याअगोदर जी. ए. ग्रियर्सन यांनी लंडन टाइम्समध्ये बारा सप्टेंबर १९०६ मध्ये प्रकाशित लेखात म्हणतात की, वंदे मातरम्ची आई मृत्यू व व विनाशाची देवी आहे'. रौलेट अहवालातही ह्या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त होत असल्याचे मान्य करण्यात आले होते.
 
बिपिनचंद्र पाल यांनी 'मातरम् इन वंदे मातरम्' (विकली न्यू इंडिया, ऑक्टोबर 1906) लेखात या गीताची जननी ही राष्ट्रमाता आहे, असे मत व्यक्त केले आहे. श्री अरविंद यांनी (1908) हे फक्त राष्ट्रगीत नसून पवित्र मंत्राच्या जयघोषातून उत्पन्न झालेली उर्जा असल्याचे म्हटले आहे. आनंदमठच्या लेखकास ही उर्जा प्राप्त झाली असल्याने ते ऋषितुल्यच आहेत. बंकिमचंद्रांनी या गीताविषयी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. हरिशचंद हलधरांच्या 1885 मधील 'मॉ' रेखाचित्रावर या गाण्याचा प्रभाव जाणवल्याशिवाय राहत नाही.
 
त्याग, बलिदान व देशप्रेमाची ज्योत आजही वंदे मातरमच्या रूपाने तेवत आहे. अक्षरधाम मंदिरात गोळ्या घालण्याअगोदर मुलांकडून वंदे मातरम् वदवून घेण्यामागे काय कारण होते? म्हणूनच ए. आर. रहमानचे 'मॉ मुझे सलाम' ही आपल्यात राष्ट्रप्रेमाचा जोष भरल्याशिवाय राहत नाही. मग हा वाद सलाम व प्रणाम यातील आहे काय? त्यामधून इतिहासाचा गौरवघोष होत असतो.
 
त्यामुळे वंदे मातरम संस्कृत नसून संस्कृती आहे. ही संस्कृती आहे बलिदान, त्याग, समर्पण व सर्वस्व पणास लावण्याची. संस्कृत व संस्कृतीबाबत निरर्थक तिरस्काराची प्रवृत्तीच नवबुद्धीमंतामध्ये मूळ धरत असल्याचे दिसतेय. पियरे बॉर्दोने सांस्कृतिक ठेव्याप्रती अनास्थेबाबत कम्युनिस्टांना चार खडे बोल सुनावले होते. कारण हा ठेवा सांप्रदायिक शक्तींच्या हाती पडण्याची भीती असते. आता तरी या गीताकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार्‍यांनी आपला आधीचा चष्मा काढून ठेवावा आणि साध्या डोळ्यांना कोणत्याही दृषिकोनाशिवाय पहावे आपल्याला त्यात देशाविषयीचे प्रेमच दिसेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुती175 हून अधिक जागा जिंकणार अजित पवारांचा दावा

मुंबईत तरुणीला ओलिस ठेवून तरुणाने केला बलात्कार,पीडितेचा प्रायव्हेट पार्ट जाळला

महाराष्ट्रात ड्राय डे, या महिन्यात 5 दिवस दारूविक्री होणार नाही

काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवार निलंबित

धर्म धोक्यात नव्हे पक्ष धोक्यात म्हणत रितेश देशमुख यांची राज्य सरकारवर टिका

पुढील लेख
Show comments