Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 15 May 2025
webdunia

जाणून घ्या, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणातील 7 फरक...

difference between flag hoisting and unfurling
, मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (15:00 IST)
आपण कधी यावर लक्ष दिले आहेत का की प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आणि स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) रोजी झेंडा फडकवण्यात काय फरक आहे ते? तर चला जाणून घ्या या दोन्ही दिवशी ध्वजारोहणातील फरक काय..
 
* 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाला झेंडा खालून रश्शीने खेचून वर नेण्यात येतो आणि मग उघडून फडकवला जातो ज्याला ध्वजारोहण असे म्हणतात कारण हे 15 ऑगस्ट 1947 च्या ऐतिहासिक घटनेला सन्मान देण्याच्या हेतूने केलं जातं, तेव्हा पंतप्रधानांनी असेच केले होते. इंग्रजीत याला Flag Hoisting असे म्हणतात. 
 
जेव्हाकि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी झेंडा वरच बांधलेला असतो आणि त्याला उघडून फडकवण्यात येतं ज्याला संविधानात Flag Unfurling (झेंडा फडकवणे) असे म्हटलं जातं.
 
* 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण करतात कारण या दिवशी भारतीय संविधान लागू झाले नव्हते आणि राष्ट्राध्यक्ष जे राष्ट्राचे संवैधानिक प्रमुख असतात त्यांनी पदभार ग्रहण केला नव्हता. या दिवशी संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष आपले संदेश राष्ट्राच्या नावावर देतात. जेव्हाकी 26 जानेवारी देशात संविधान लागू होण्याच्या निमित्ताने साजरी केली जाते त्या दिवशी संवैधानिक प्रमुख राष्ट्राध्यक्ष झेंडा फडकवतात.
 
* स्वातंत्र्य दिनाला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं जातं जेव्हाकी प्रजासत्ताक दिनी राजपथावर झेंडा फडकावला जातो.
 
* संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर आयोजनासह साजरा केला जातो जेव्हाकी स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने साजरा केला जातो.
 
* प्रजासत्ताक दिवशी देश आपली सैन्य ताकद आणि सांस्कृतिक विलक्षणता दर्शवतो. जेव्हाकी स्वातंत्र्य दिन असे काही आयोजन नसतात.
 
* 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी समारंभात प्रमुख अतिथींना आमंत्रण दिलं जातं. 
 
* 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट दोन्ही राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन तर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य ‍दिन असे म्हटलं जातं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CBI: काय आहे सीबीआय चा इतिहास, कोणत्या परिस्थितीत आणि प्रकरणात होते सीबीआय चौकशी ...