Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तेव्हाच्या काळातील भारतातील मोठे स्वदेशी बिझनेस हाउस

Independence Day In Marathi
टाटा ग्रुप (1868)
29 वर्षांचे जमशेदजी नोशेरवां टाटा यांनी वर्ष 1868मध्ये 21 हजाराची पुंजी लावून ट्रेडिंग कंपनी सुरू केली. त्यांनी चिंचपोकळीत दिवाळखोर झालेली एक तेल मिलची खरेदी केली व त्याला नंतर कॉटनमिलमध्ये परिवर्तित केले. दोन वर्षांमध्ये या मिलला फायद्याच्या स्थितीत आणून ठेवले. यानंतर टाटा ग्रुपचा विस्तार झाला. स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस टाटा ग्रुप एक बहुराष्ट्रीय कंपनी बनली होती. त्याचे चार मुख्य लक्ष्य होते - हाइड्रो इलेक्ट्रिक प्लांट, स्टील प्लांट, वर्ल्ड क्लास एज्युकेशनल इंस्टिट्यूट आणि एक मोठे हॉटेल. त्यांनी आपल्या सर्व लक्ष्यांना हकीकत मध्ये बदलले. 
 
Independence Day In Marathi
डाबर (1884) 
डॉक्टर बर्मन कोलकाता जवळच्या एका लहान गावात उपचारासाठी गेले होते. रुग्णांचा उपचार करताना त्यांनी आपल्या आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने बर्‍याच ग्रामीण जनतेला बरे केले होते. यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याप्रती विश्वास वाढू लागला. आणि त्यांच्या औषधांचे चर्चे होऊ लागले. ते लवकरच आपल्या परिसरातून बाहेर देखील प्रसिद्ध होऊ लागले. त्यांनी बंगालमध्ये एक लहान क्लिनिक सुरू केले, जे आता देशातील चवथी मोठी एफ.एम.सी.जी. कंपनीत बदललेली आहे. आजच्या तारखेत ते जगातील आयुर्वेदिक औषधांचे उत्पादक आहे. 
 
Independence Day In Marathi
गोदरेज (1897) 
आर्देशिर गोदरेज आधी वकालत करत होते. तेव्हा त्यांच्या डोक्यात ताळे बनवण्याच्या योजनेने जन्म घेतला.  त्यांनी आपल्या वकिलीचा पेशा सोडून ताळे बनवण्याचे काम सुरू केले. लवकरच त्यांनी निर्मित केलेले ताळ्यांमुळे लोकांच्या मनात विश्वास बसू लागला आणि बघता बघता ते जगातील सर्वात मजबूत आणि सुरक्षित अलमारी आणि इतर सुरक्षेचे उपकरण तयार करू लागले. त्यानंतर त्यांनी साबण ते व्हेजिटेबल तेलाचे उत्पादन सुरू केले. नंतर ते बघता बघता ग्लोबल ब्रँड बनले. 
 
Independence Day In Marathi
नीलगिरीज (1905) 
एस. अरुमुगा मुदलियार ब्रिटिश राजमध्ये चेक एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत होते. जेव्हा ते एरोड जिल्ह्यातून उटी किंवा कुनुर जात होते, तेव्हा लोक त्यांना बरेच सामान आणण्याची मागणी करत होते. आधी त्यांनी वानारपेटाच्या एका अंग्रेजाकडून त्याच्या लोण्याचा Butter  बिझनेस विकत घेतला आणि नीलगिरी डेअरी फर्म सुरू केला. आधी ते आपल्या स्टोअर मध्ये डेअरी प्रॉडक्ट्स ठेवत होते आणि नंतर दुसरे सामान ठेवू लागले. अरुमुगा यांचा मुलगा युरोपहून परतला आणि  आल्यावर त्याने बंगळूरूमध्ये 1936 मध्ये सुपर मार्केट स्थापित केले. 
 
Independence Day In Marathi
रुह आफ्जा ( 1907) 
दिल्लीच्या हकीम अब्दुल मजीद यांनी बरेच जडीबुटी, भाज्या, फळ आणि फुलांना एकत्रित करून एक शर्बत तयार केले, जो रूह आफ्जाच्या नावाने घरा घरापर्यंत पोहोचले. उन्हाळ्यात हा उत्पाद फारच शीतलता देत होता. नंतर ही कंपनी जेव्हा बर्‍याच युनानी मेडिसिनचे उत्पाद तयार करू लागली, तर याचे नाव हमदर्द ठेवण्यात आले. नंतर या कंपनीने पाकिस्तान आणि बांगलादेशात आपला व्यवसाय सुरू केला. विभाजनानंतर हकीम मजीदचे पार्टनर आणि मुलगा पाकिस्तानात गेले आणि त्यांनी तेथे देखील याच नावाने कंपनी उघडली.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीना आधार नंबराचे आता हे काम नाही करून शकणार तुम्ही!