Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pakistan बसच्या आगीत 18 जणांचा जळून मृत्यू

Pakistan Bus Fire
, गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (15:41 IST)
बुधवारी रात्री पाकिस्तानात एका मोठ्या बस अपघातात 18 पूरग्रस्तांचा मृत्यू झाला. एसी बसला आग लागल्याने आठ मुले आणि नऊ महिलांसह 18 जिवंत जाळून मेले.
 
पोलिसांनी सांगितले की, ही घटना बुधवारी रात्री सिंध प्रांतातील नूरीबाद पोलीस स्टेशन परिसरात घडली. बसमध्ये 80 पूरग्रस्त होते. बातमीप्रमाणे ही बस खैरपूर नाथन शाहहून कराचीच्या दिशेने जात होती. जखमींना जामशोरो आणि नूरियाबाद येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बसच्या एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा संशय आहे. आगीपासून वाचण्यासाठी काही प्रवाशांनी चालत्या बसमधून उड्या मारल्या.

Edited by: Rupali Barve

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nokia G11 Plus : नोकियाचा 50MP कॅमेरा असलेला स्वस्त स्मार्टफोन लॉन्च