Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

3 वर्षाच्या मुलीने खेळता खेळता स्वतःवर गोळी झाडली,सुदैवाने बचावली

Webdunia
शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (13:53 IST)
घरात लहान मुले असले की , त्यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. अन्यथा लहान मुले अनेकदा गैरवर्तन करून आपला जीव धोक्यात घालतात. त्यामुळे त्यांची काळजी घेताना प्रत्येक पालकाने काळजी घेणे गरजेचे आहे. आता फ्लोरिडातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 3 वर्षाच्या मुलीने खेळताना बंदूक उचलली आणि स्वतःवर गोळी झाडली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मुलगी स्वत:वर गोळी झाडताना दिसत आहे.सेरेनटी असे या चिमुकलीचे नाव आहे.  

ही  घटना फ्लोरीडाची आहे. या मुलीचे पालक कामात व्यस्त होते. ही मुलगी घरातच खेळत होती. खेळता- खेळता तिने सोफ्यावर ठेवलेली बंदूक उचलली आणि स्वतःवर गोळी झाडली. त्यांनतर मुलीच्या किंचाळण्यांचा आवाज ऐकून एक जवळच असलेल्या व्यक्तीच्या कानावर गेला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि तिला सांभाळू लागतो. आणि घरातील इतर सदस्यांना आवाज देतो. मुलीला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. 
मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला निक्लॉस चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तेथे तिच्या हातातील गोळी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली असून मुलीची प्रकृती आता स्थिर आहे.

व्हायरल होत असलेल्या या घटनेचा व्हिडिओ मुलीची आजी रॉबिन फुलर यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. जवळ असलेला व्यक्ती त्यांचा नातेवाईक असून बेकायदेशीर बंदूक बाळगण्यासाठी त्याला पोलिसानी अटक केली. नंतर त्याला बॉन्डवर सोडण्यात आले. मुलीच्या आजीने म्हटले की सुदैवाने मुलीला जास्त काही झाले नाही. नाहीतर अघटित घडले असते. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुढील लेख
Show comments