Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
काही लोक नवीन काही तरी करण्याच्या नादात जीवाची पर्वा करत नाही. असेच काहीसे हटके करण्याच्या पायी एकाने स्वतःला जमिनीच्या आत तब्बल सात दिवस दफन केले. त्यांनतर बाहेर पडल्यावर त्याला खूप मानसिक त्रास झाला. याचा व्हिडीओ देखील शेअर केला असून या व्हिडीओला आत्ता पर्यंत 57 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहे. यावर लोक आपापली प्रतिक्रिया देत आहे.
हा व्यक्ती एक युट्युबर असून तो मिस्टर बिस्ट म्हणून ओळखला जातो. मात्र त्याच नाव जिमी डोनाल्डसन असून तो 25 वर्षाचा आहे. या व्हिडीओ मध्ये त्याने हे धोकादायक आहे असे घरी करू नका असे म्हटले आहे.
तो जगाचा सर्वात श्रीमंत युट्युबर असल्याचे म्हटले जाते. त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो एका शवपेटीमध्ये आहे. या मध्ये जेवण्यापासून झोपण्यापर्यंतच्या सर्व सोयी केलेल्या आहे.सर्वप्रथम एक खड्डा खणला गेला त्यावर माती घातली नंतर ती झाकली जाते. त्याने शवपेटीतुन एक व्हिडीओ बनवला आहे.
काही लोक बाहेरच्या बाजूस आहे. बिस्ट म्हणतो. मी माझं जीवन पुढील सात दिवस शवपेटीत घालवणार आहे.
याचा त्याच्या मानसिक आरोग्यावर खूपच परिणाम झाला असून बाहेर आल्यावर तो ढसाढसा रडला. बिस्ट ने स्वतःचा 50 तास दफन राहण्याचा विक्रम यंदा मोडला आहे.