Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2 वर्षाच्या मुलाने वडिलांवर गोळी झाडली

Webdunia
मंगळवार, 7 जून 2022 (22:46 IST)
अमेरिकेतील फ्लोरिडा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, फ्लोरिडाच्या ईस्ट ऑरेंज काउंटीमध्ये एका 2 वर्षाच्या मुलाने चुकून आपल्या वडिलांवर गोळी झाडली. सोमवारी झालेल्या घटनेची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर मुलाच्या आईविरुद्ध फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 मे रोजी घडली आणि मुलाचे वडील, 26 वर्षीय रेगी मॅब्री, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ते व्हिडिओ गेम खेळत होते.
 
ऑरेंज काउंटी शेरिफ ऑफिसच्या अहवालानुसार, मॅब्रीचे कुटुंब मेट्रो ऑर्लॅंडोमध्ये भाड्याच्या घरात राहते. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी मेरी अयाला आणि 3 मुले आहेत.ऑरेंज काउंटी शेरीफ जॉन मिना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ' बंदुक सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे एका 2 वर्षाच्या मुलाने तिथे पोहोचून चुकून वडिलांवर गोळी झाडली .ऑरेंज काउंटीच्या शेरीफने सांगितले की,अयाला( 28) हिच्यावर हत्येचे प्रमाण नसून दोषी मनुष्यवधाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
 
आयला आणि मॅब्री यांच्यावर त्यांच्या दोन मुलांची योग्य काळजी न घेतल्याचा आणि ड्रग्स घेतल्याचा आरोपही या प्रकरणातून उघड झाला आणि ते प्रोबेशनवर होते. आयलाने तपासकर्त्यांना सांगितले की तिच्या 5 वर्षांच्या मुलाने तिला सांगितले की त्याच्या 2 वर्षांच्या भावाने बंदूक चालवली होती. तो म्हणाला की मोठा मुलगा त्याच्या धाकट्या भावाकडे शस्त्र कसे उपलब्ध झाले हे स्पष्ट करू शकला नाही.
 
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत मुलांना कोणतीही इजा झाली नाही आणि त्यांना फ्लोरिडाच्या चिल्ड्रेन अँड फॅमिली डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात आले आहे. ही बंदूक सुरक्षित ठिकाणी ठेवली असती तर ही घटना टाळता आली असती, असे शेरीफने सांगितले. आता या चिमुकल्यांनी आपले आई-वडील दोघेही गमावले आहेत. आपल्या हातून वडिलांना जीव गमवावा लागल्याचा धक्का सहन करत  एका चिमुकल्याला आयुष्य भर जगावं लागणार आहे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments