Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

28 वर्षांची मुलगी 70 वर्षाच्या माणसाच्या प्रेमात पडली, केलं लग्न

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (16:56 IST)
social media
प्रेमाला वयाचं बंधन नाही असं म्हणतात, असच काही एका 28 वर्षांच्या मुलीने तिची प्रेमकहाणी शेअर केली आहे. 28 वर्षाची जॅकी आणि 70 वर्षाचा डेव्हिड यांनी प्रेम संबंधातून लग्न केले. जॅकी ने तिच्या पेक्षा 42 वर्षांनी मोठ्या असलेल्या डेव्हिडला तिचे हृदय कसे दिले ते सांगितले. जॅकी लग्नापूर्वी फिलिपिन्स मध्ये राहायची आणि डेव्हिड हे अमेरिकेत राहायचे. ऑनलाईन ओळख झाल्यावर काही दिवस भेटल्यावर ते दोघे डेटवर जाऊ लागले नंतर त्यांनी लग्न केले. मात्र या लग्नानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरु केले. तिने   पैशाच्या लालसेपोटी एका 70 वर्षांच्या वृद्धाशी लग्न केले. असे लोकांनी म्हणाल्या सुरु केले.पण त्यांचे प्रेम खरे असून ते त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी असल्याचे या जोडप्याचे म्हणणे आहे.
 
जॅकी आणि डेव्हिड हे 2016 मध्ये एका डेटिंग साईटवर भेटले आणि त्यांच्यात मैत्री झाली नंतर त्यांनी भेटण्याचं ठरविलं आणि भेट झाल्यावर त्यांच्यात प्रेम निर्माण झालं आणि त्यांनी एकत्र दिवस घालवले त्यांच्यातील जवळीक वाढत होती. डेव्हिड दर दोन महिन्यांनी जॅकीला भेटण्यासाठी फिलिपाइन्सला येत असे. अखेर 2018 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि जॅकी कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे शिफ्ट झाली. अखेर त्यांनी 2018 मध्ये लग्न केले 
 
कोविड लॉकडाऊन दरम्यान जॅकीने स्वतःचे टिकटॉक खाते तयार केले आणि त्यावर तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी शेअर करण्यास सुरुवात केली. त्याच्या अकाऊंटवर 50 .हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. वापरकर्ते त्यांच्या पोस्टवर विविध कमेंट करतात. कोणी जॅकीला लोभी म्हणत तर जॅकीला अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी ग्रीन कार्डची गरज होती, म्हणून तिने डेव्हिडशी लग्न केले. असं म्हणत आहे.  
 
मात्र, कपल अशा नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करतो. डेव्हिड म्हणाला- जर दोन लोक एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना आयुष्य एकत्र घालवायचे असेल तर वयाचे बंधन घालू नये लोकांनी टीका करू नये. आम्ही दोघे आनंदी आहोत. त्याचवेळी जॅकीने डेव्हिडबद्दल सांगितले की, तो खूप सरळ आणि चांगल्या स्वभावाचे  माणूस आहे. ते माझा आदर करतात आणि माझ्यावर त्याहून अधिक प्रेम करतात. त्यांच्याशी  लग्न केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही.आम्ही एकमेकांसह आनंदी आहोत.  
 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीर : किश्तवाडमध्ये चकमकीत एक जवान शहीद

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments