पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मंगळवारी या भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपाचे धक्के इतके तीव्र नव्हते, त्यामुळे अनेकांना त्याची माहितीही मिळू शकली नाही. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.4 इतकी मोजली गेली. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू क्वेट्टापासून उत्तर-पश्चिम 150 किलोमीटर अंतरावर 35 किलोमीटर खोलीवर होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी क्वेटा, नोश्की, चागी, चमन, किला अब्दुल्ला, दलबादिन, पिशीन आणि प्रांतातील इतर काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
पाकिस्तानच्या हवामान खात्याने सांगितले की, पाकिस्तान-इराण सीमा भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. सध्या यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.