Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब ! दागिन्यांनी भरलेल्या वधूला चालणेही कठीण झाले, लग्नात 60 किलोचे सोन्याचे दागिने घातले,फोटो व्हायरल

Webdunia
रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (13:13 IST)
चीनमधील एक वधू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वधूने लग्नाच्या दिवशी तब्बल 60 किलो सोन्याचे दागिने घातले. हुबेई प्रांतातील या वधूला तिच्या लग्नाच्या दिवशी पाहून सगळेच स्तब्ध झाले. 30 सप्टेंबर रोजी लग्नात तिने घातलेल्या जड दागिन्यांमुळे वधूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या चित्रात वधू पांढरा लग्नाचा ड्रेस आणि हातात गुलाबांचा पुष्पगुच्छ घेताना दिसत आहे
 
दागिन्यांच्या वजनामुळे वधूला हलणे अवघड होत होते आणि ती चालण्यासाठी वराची  मदत घेत होती. मीडिया रिपोर्टनुसार, हे दागिने वधूला तिच्या पतीने हुंडा स्वरूपात दिले होते. वराने तिला प्रत्येकी एक किलो वजनाचे 60 सोन्याचे हार दिले. हार व्यतिरिक्त तिने हातात जड बांगड्याही घातल्या आहेत.
 
वराच्या कुटुंबीयांनी तिला बांगडी भेट म्हणून दिली. असे सांगितले जात आहे की वराचे कुटुंब खूप श्रीमंत आहे. बऱ्याचदा लोक सामाजिकरित्या लोकांना दाखवण्यासाठी दागिने घालतात, पण या वधूला पाहून लग्नाला आलेल्या लोकांना तिच्यावर दया येत होती. लग्नातील एका पाहुण्याने वधूला मदत करण्याची इच्छा दर्शवली, ज्याला तिने हसून नकार दिला. ती म्हणाली की ती ठीक आहे आणि लग्नाच्या विधींचे पालन करत राहील.
 
सोने हे 'सौभाग्याचे' प्रतीक आहे येथील
स्थानिक लोक सोन्याला 'सौभाग्याचे' प्रतीक मानतात. येथील लोकांसाठी सोने हे वैभव आणि संपत्तीचे लक्षण आहे. लोक वाईट आत्म्यांपासून आणि दुर्दैवापासून मुक्त होण्यासाठी सोन्याचा वापर करतात. वधूचे बरेच हार आणि बांगड्या घातलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments