Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

न्यूयॉर्कमध्ये ब्रुकलिन मेट्रो स्टेशनात गोळीबार, किमान 13 जखमी

At least 13 people were injured in a shooting at a Brooklyn subway station in New York
, मंगळवार, 12 एप्रिल 2022 (20:34 IST)
अमेरिकेत न्यूयॉर्क शहरात ब्रुकलिन सबवे स्टेशनमध्ये गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सनसेट पार्क इथे 36 स्ट्रीट स्टेशनात सकाळी साडेआठ वाजता हल्ला झाला आहे. या हल्ल्यात किमान 13 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 
या भागापासून दूर राहण्याचा सल्ला स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दिला आहे. मेट्रो उशिराने धावतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. जीवितहानीचं स्वरूप अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
गोळीबारानंतर धुराचे लोट उठल्याने मदतयंत्रणांनी घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्टेशनात अनेक जण रक्ताळलेल्या स्थितीत दिसत असलेले फोटो समोर येत आहेत. स्टेशनात स्फोटकं सापडल्याचंही बातम्या समोर येत आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाण्यात राज ठाकरे यांची उत्तरसभा ;उत्तरसभेत राज ठाकरे म्हणाले ..