अलिकडे ब्राझीलमध्ये भूकंपानंतर आलेल्या भीषण पुरामुळे विध्वंस झाला आहे. येथे सुमारे 126 लोकांचा मृत्यू झाला आहे. या महापुरात सुमारे 756 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 20 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. बचाव पथक परिसरात बचाव कार्यात गुंतले आहे.पुरामुळे अनेक ठिकाणाचे रस्ते वाहून गेले आहे.
एल निनो हवामानाच्या घटनेमुळे वातावरणातील बदलांवर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ब्राझीलमध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुराने कहर केला आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. अनेक शहरे पुराच्या पाण्याने बुडाली असून भूस्खलनाला सुरुवात झाली आहे. या पुरात डझनभर लोक बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेत 756 लोक जखमी झाले आहे. शहरात पाऊस आणि पुरामुळे व्यवसाय कोलमडू लागला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,141 लोक अजूनही बेपत्ता आहेत.
राज्यातील गुआइबा नदीच्या पाणी पातळीने या आठवड्यात ऐतिहासिक पातळी गाठली. पाणीपुरवठा अजूनही कमी आहे. पोर्टो अलेग्रेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. कॅम्प आणि हॉस्पिटलमध्ये टँकर पोहोचवले जात आहेत.
एल्डोराडो डो सुल या उद्ध्वस्त शहरात रस्ते पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. येथे बोटीच्या सहाय्याने लोकांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे,