Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

चंद्रावरची दगड-माती गोळा करून चीनचं चँग-5 यान पृथ्वीवर उतरलं

चंद्रावरची दगड-माती गोळा करून चीनचं चँग-5 यान पृथ्वीवर उतरलं
, गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (12:28 IST)
चीनचं चँग-5 यान चंद्रावरचे दगड आणि मातीचे नमुने घेऊन पृथ्वीवर परतलं आहे.
 
चंद्राच्या अप्रकाशित अशा भागात कार्यरत चँग-5 यान दगड आणि मातीच्या नमुन्यांचा समावेश असणारी कॅप्सूल घेऊन मंगोलियात स्थानिक वेळेनुसार दीड वाजता उतरलं.
 
अमेरिकेचं अपोलो आणि रशियाच्या लुना या चांद्रमोहिमा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर 40 वर्षांनी चीनचं यान मातीच्या नमुन्यांसह परतलं आहे.
 
यामुळे चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल, तिथल्या भौगोलिक स्थितीबद्दल, भूगर्भाबद्दल, इतिहासाबद्दल नव्याने काही कळू शकतं.
 
चँग-5 यशस्वी परतणं हे चीनच्या अंतराळविश्वातल्या दमदार मुशाफिरीचं द्योतक आहे.
 
चंद्रावरून परतलेली हे यान इन्फ्रारेड कॅमेरे वापरणाऱ्या हेलिकॉप्टरांना दिसलं. यानाची ओळख पटल्यानंतर चीनने त्या बर्फाच्छादित भागात आपला ध्वज फडकावला.
 
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस चँग-5 चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. विविध गोष्टींचं परीक्षण करण्यासाठी चीनचं यान अंतराळात झेपावलं होतं. यानाचा एक भाग चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी तिथे उतरला.
 
नमुने घेण्यासाठी यानाने स्कूप अँड ड्रिल पद्धती वापरली. किती व्याप्तीचं परीक्षण करण्यात आलं हे समजू शकलेलं नाही मात्र दोन ते चार किलो आकाराचे हे नमुने असू शकतात.
 
चंद्रावरून परतणारं चँग-5 आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रातून परतणाऱ्या कॅप्सूलपेक्षा वेगाने परतलं आहे.
 
परतण्याआधी पृथ्वीच्या बाह्य आवरणात असलेल्या वायूपटलामध्ये हे यान होतं. तिथून पृथ्वीवर उतरण्याचे त्याचे प्रयत्न सुरू झाले.
 
चीनमधल्या इनर मंगोलिया प्रदेशातल्या सिझिवांग भागात पॅराशूटच्या माध्यमातून ही कॅप्सूल पृथ्वीवर परतली. चीनचे अंतराळवीरही मोहीम फत्ते करून याच भागात उतरले होते.
 
इन्फ्रारेड कॅमेऱ्यांनी कॅप्सूलच्या आगमनाने निर्माण झालेली उष्णता टिपत अचूक स्थान ओळखलं.
 
अमेरिकेच्या अपोलो आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या लुना या मोहिमांमध्ये चंद्रावरच्या पृष्ठभागावरचे 400 किलो नमुने जमा करण्यात आले होते.
 
पण हे नमुने खूप जुने होते. काही दशलक्ष वर्ष जुने. चँग-5 ने आणलेले एकदमच वेगळे असतील.
 
चंद्राच्या उत्तर पश्चिमेकडचा मॉन्स रुमकर या ज्वालामुखीमय भागाकडे चीनने लक्ष केंद्रित केलं होतं.
 
या भागातल्या दगडांचे, मातीचे नमुने 1.2, 1.3 दशलक्ष वर्षांपेक्षा जुने असणार नाहीत. चंद्राची अंतर्गत रचना नेमकी कशी झाली याचा उलगडा या नमुन्यांद्वारे होऊ शकतो.
 
सौर मंडळातल्या ग्रहांचे पृष्ठभाग किती वर्षांचे आहेत हे अधिक अचूकपणे कळू शकेल. क्रेटरची संख्या जास्त तेवढा तो पृष्ठभाग जुना. क्रेटरच्या मोजणीद्वारे हे समजू शकतं. कॅप्सूलने किती ठिकाणचे नमुने गोळा केले आहेत यावर ते अवलंबून आहे.
 
अपोलो आणि सोव्हिएत लुनासंदर्भात हा संदर्भ महत्त्वाचा होता. चँग-5 येत्या काळातल्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण तपशील देऊ शकतं.
 
चंद्र हा अनेक देशांना खुणावतो आहे. या दशकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. रोबोटिक यान माणसांना घेऊन येणाऱ्या यानाआधी पाहणी करेल.
 
यापैकी काही मोहिमा राष्ट्रीय अवकाश संस्थांतर्फे हाती घेतल्या जातील तर काही खाजगी स्वरुपाच्या असतील.
 
युकेतल्या अक्सेस स्पेस अलायन्स या कंपनीचे संचालक टोनी अझारली म्हणाले, येणारा काळ खूपच उत्साहवर्धक असेल. स्पेसबिट या कंपनीने चंद्रावर यान पाठवण्याची तयारी केली आहे.
 
पहिल्यांदाच माणसासारखा दिसणारा, काम करणारा रोबो चंद्रावर जाण्याची ही पहिलीच वेळ असेल. चंद्रावरून माणसं यशस्वीपणे परतल्यानंतरच या मोहिमांना चालना मिळू शकते असं त्यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उंबरा असते एक मर्यादा