Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

ग्रीन कार्डसाठी लॉटरीऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देणार : ट्रम्प

ग्रीन कार्डसाठी लॉटरीऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देणार  : ट्रम्प
, बुधवार, 31 जानेवारी 2018 (16:02 IST)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरणात बदलाचे संकेत देत भारतीयांना दिलासा दिला आहे. ग्रीन कार्डसाठी लॉटरीऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
 

अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी दरवर्षी हजारो एच-१बी व्हिसाधारक अर्ज करतात. ‘एच १ बी’ व्हिसा लॉटरीद्वारे दिला जातो. ट्रम्प यांनी ही पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अकुशल लोकांनाही अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळू शकत होते. आता याऐवजी गुणवत्तेच्या आधारेच व्हिसा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय ट्रम्प यांनी चेन मायग्रेशनवरही निर्बंध आणणार असल्याचे सांगितले. सध्या एखादा व्यक्ती त्याच्या नातेवाईकांना अमेरिकेत आणू शकत होता. आता यावर निर्बंध येतील. आता ती व्यक्ती फक्त पती किंवा पत्नी आणि मुलांनाच सोबत अमेरिकेत आणू शकेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. जी व्यक्ती कुशल आहे. समाजात ते योगदान देऊ शकतात आणि जे अमेरिकेवर प्रेम करु शकतात, त्यांनाच व्हिसा मिळेल, असे त्यांनी सांगितले.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रेनसमोरचा 'तो' सेल्फी फेक