suvichar

कावळे उचलतात सिगारेटचे थोटके

Webdunia
सिगारेटच्या अर्धवट जळालेल्या तुकड्यांनी नेदरलँडवासीय हैराण झाले असून या तुकड्यांचे ढीग रसत्यांवर साचले आहेत. अखेर यावर नामीशक्कल म्हणून कावळ्यांना कामाला जुंपण्यात आले आहे. कावळ्यांकडून हे काम करुन घेण्यासाठी एक खास चमू काम करत आहे.
 
सर्व पक्ष्यांमध्ये कावळ्याला सर्वाधिक बुद्धिमान पक्षी समजले जाते. त्यामुळे हे काम त्याच्याकडे सोपविण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. नेदरलँडमध्ये वर्षाला साधारण 60 लाख टन सिगारेटच्या थोटकांचा कचरा जमा होतो. हा कचरा साफ करण्यासाठी 12 वर्षे लागतील, असा अंदाज आहे. त्यामुळे कावळ्यांच्या मदतीने हा कचरा साफ करण्याची कल्पना क्रोटेड सिटी या कंपनीने काढली. रूबन व्हॅन डेर आणि बॉब स्फीकमेन हे या कंपनीचे संस्थापक आहेत.
 
या कंपनीने आधी नेदरलँडमधील निवडक ठिकाणच्या कावळ्यांना प्रशिक्षण दिले. रसत्यावर पडलेले थोटक उचलून ते जागोजागच्या कुंड्यांमध्ये टाकायला त्यांना शिकविण्यात आले. त्याबदल्यात या कावळ्यांना भरपूर खायला देण्यात येते. सध्या हे कावळे थोटके व्यवस्थित कुंड्यांमध्ये टाकत असल्याचे सांगण्यात आले आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी एक संकेतस्थळही सुरू करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

LIVE: १ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी चा वापर पूर्णपणे अनिवार्य, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

7100mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले असलेला मोटोरोला एज 70 मॅक्स 15 जुलै रोजी लॉन्च होणार

१ ऑगस्टपासून ही शासकीय कागदपत्रे डिजिटल स्वाक्षरीशिवाय दिली जाणार नाहीत, महाराष्ट्र शासनाचा निर्णय

7 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कमी उंचीच्या लोकांनाही ट्रॅफिकमध्ये अडचण येणार नाही, यादी पहा

मुंबईतील बीएमसी रुग्णालयांमध्ये 'एक रुग्ण, एक कुटुंबीय' नियम लागू होणार

पुढील लेख
Show comments