Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंडोनेशियात भूकंपाचा जोरदार धक्का, लोकांमध्ये घबराट

earthquake
, मंगळवार, 8 एप्रिल 2025 (09:18 IST)
Jakarta News: इंडोनेशियाच्या पश्चिम आचे प्रांतात मंगळवारी सकाळी ५.९ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
ALSO READ: औरंगजेबाची कब्रस्तान 'खुल्दाबाद'चे नाव रतनपूर करण्याची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी इंडोनेशियाच्या पश्चिम आचे प्रांतात ५.९ तीव्रतेचा भूकंप झाला. तसेच या भूकंपामुळे अजून कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. एजन्सीनुसार, मंगळवारी जकार्ता वेळेनुसार पहाटे २:४८ वाजता भूकंप झाला, त्याचे केंद्रबिंदू सिम्युलुए रिजन्सीमधील सिनाबुंग शहरापासून ६२ किमी आग्नेयेस, समुद्रसपाटीपासून ३० किमी खाली होते.
ALSO READ: बॉम्बच्या धमकीनंतर जयपूर वरून येणाऱ्या इंडिगो विमानाचे मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग
भूकंपामुळे मोठ्या समुद्री लाटा निर्माण होण्याची शक्यता नसल्याने त्सुनामीचा इशारा देण्यात आला नव्हता. तसेच जिथे भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला होता, आजून कोणतेही गंभीर नुकसान किंवा जीवितहानी झाले नाही. अशी माहिती समोर आली आहे. तसेच इंडोनेशिया हा एक द्वीपसमूह राष्ट्र आहे, जो भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर असल्याने भूकंपांना बळी पडतो.
ALSO READ: नागपूर : कूलर फॅक्टरीत भीषण आग
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

औरंगजेबाची कब्रस्तान 'खुल्दाबाद'चे नाव रतनपूर करण्याची मागणी