Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Earthquake : पहाटे तीन देशांत भूकंपाचे धक्के, जीवित हानी नाही

Webdunia
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2023 (08:51 IST)
मंगळवारी सकाळी तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानमध्ये पहाटे 03:38 वाजता भूकंप झाला, ज्याची तीव्रता 4.2 इतकी मोजली गेली. त्याचा परिणाम भारताच्या काही भागांवरही झाला. चांगली गोष्ट म्हणजे आतापर्यंत कोणत्याही जीवित वा वित्तहानीची बातमी नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, पहाटे 3:38 (IST) च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू 34.66 अंश उत्तर अक्षांश आणि 73.51 अंश पूर्व रेखांशावर 10 किमी खोलीवर होता.
याव्यतिरिक्त, पापुआ न्यू गिनीच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर पहाटे 03:16 वाजता 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवला गेला . युनायटेड नेशन्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितले की, मंगळवारी पापुआ न्यू गिनीच्या वेवाक येथे 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. USGS ने सांगितले की भूकंप 44 किमी (27.34 मैल) खोलीवर होता. ऑस्ट्रेलियाच्या हवामानशास्त्र ब्युरोने सांगितले की, भूकंपामुळे ऑस्ट्रेलियात सुनामीचा धोका नाही.
 
चीनच्या जिजांग प्रांतात भूकंप, तीव्रता 5.0
इथेही 5.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची बातमी चीनमधून आली तेव्हा भूगर्भशास्त्रज्ञ इथल्या धोक्याचा अंदाज घेत होते. चीनच्या जिजांग प्रांतात पहाटे 03.45 वाजता हा भूकंप झाला. सध्या कुठूनही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments