Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अबब! येथे भुवयाही गोठतात

international interesting news
थंडी येणार म्हटली तरी आपण उबदार कपडे बाहेर काढून त्यांना ऊन दाखवून ठेवतो. तापमान 20 अंश सेल्यिसच्या खाली गेले तरी आपण पार गारठून जातो. पण ओयमियाकोन या सैबेरीयामधील शहरातील तापमान ऐकून तुम्हाला नक्कीच आर्श्याचा धक्का बसेल. सध्या उणे 62 अंश सेल्सियस आहे. आता ते तापमान म्हणजे याठिकाणी राहणार्‍या लोकांची काय स्थिती असेल वेगळे सांगायलाच नको. याठिकाणचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये लोकांच्या भुवया आणि पापण्यांचे केसही गोठले असल्याचे या फोटोमधून दिसते आहे.
 
या शहराने आतापर्यंत उणे 67 अंश सेल्सियस तापमानाचे रेकॉर्ड केले आहे. असे असले तरीही या शहरात राहणार्‍यांचे दैनंदिन जीवन अतिशय सुरळीत आहे. त्यांना इतक्या कमी वातावरणात वावरण्याची सवय लागल्याने त्यांना फारसा फरक पडत नाही. कितीही अडचणी येत असतील तरीही त्यांची रोजची कामे नेहमीप्रमाणे सुरु असतात. या ठिकाणी फक्त 500 लोक राहतात. या गावातील अनेक लोक भटक्या जमातीतील आहेत, कडाक्याची थंडी आणि दळणवळणाच्या अत्यल्प सुविधा यामुळे या गावाचा शहरांशी संपर्क तुटला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता व्हॉटस्‌अ‍ॅपद्वारेही पाठवता येणार पैसे