नेपाळच्या 7,000 मीटर उंच धौलागिरी पर्वतावर घसरून पाच रशियन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे.या गिर्यारोहकांनी शरद ऋतूमध्ये जगातील या सातव्या सर्वोच्च शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केली.
अलेक्झांडर दुशेयको, ओलेग क्रुग्लोव्ह, व्लादिमीर चिस्तीकोव्ह, मिखाईल नोसेन्को आणि दिमित्री श्पिलेवोई अशी मृतांची नावे आहेत. शिखरावर चढाई करताना या गिर्यारोहकांचा सकाळी सहा वाजता बेस कॅम्पशी संपर्क तुटला.
मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व गिर्यारोहक एकाच दोरीच्या साहाय्याने 8,167 मीटर उंच शिखराकडे जात असताना ते बेपत्ता झाले. यानंतर हेलिकॉप्टरला 7,700 मीटर उंचीवर ते मृतावस्थेत आढळले. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडचण आली.
आणखी एका रशियन गिर्यारोहकाची हेलिकॉप्टरने बेस कॅम्पमधून सुटका करण्यात आली. मात्र, या मृत गिर्यारोहकांना उंच भागातून कधी आणि कसे खाली आणले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.