Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चार वर्षांचा मुलगा पडला आर्केड मशीनमध्ये

international news
फ्लोरिडा- लहान मुले आपली आवडती खेळणी मिळवण्यासाठी काय करतील याचा भरवसा नाही. फ्लोरिडाच्या एका रेस्टॉरंटमध्ये चार वर्षांच्या मुलाने असाच काहीसा उद्योग केला आणि तो चक्क आर्केड मशीनमध्ये अडकून बसला. या मशीनमध्ये नाणे टाकून तुम्हाला आवडीचे खेळणे एक छोट्या क्रेनच्या मदतीने उचायलचे असते. त्यासाठी मशीच्या बाहेर एक बटन दिलेले असते.
 
मात्र या मुलाने खेळणे मिळवण्यासाठी थेट मशीनच्या आत उडी मारली. आपण अडकल्याचे लक्षात आल्यावर त्याने ओरडण्यास प्रारंभ केला आणि मग सगळ्यांच्या लक्षात आले. यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी या मुलाला बाहेर काढले. अर्थात त्या मशीनमध्ये नेमकी कशी उडी मारली हे मात्र त्या मुलाला सांगता आले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भावनाप्रधान होऊ नका, राजकीय भेटीगाठी थांबवा : भुजबळ