Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉस एंजेलिसमध्ये हाऊस पार्टी दरम्यान चार ठार, एक जखमी

Four killed
, मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:31 IST)
अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये रविवारी रात्री एका हाऊस पार्टीत गोळीबार झाला. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे महापौर जेम्स बट्स यांनी सांगितले. मृतांमध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. जखमींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत विविध प्रकारच्या शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 1990 नंतर अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. 
 
हल्लेखोरांनी चौघांना लक्ष्य करून त्यांची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरीकडे महापौर बट्स यांनी आरोपींना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. त्याचा तपास पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळी बसवण्यात आलेले सीसीटीव्हीही तपासले जात आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तेव्हा संजय राऊत यांची बोबडी का वळली? शेलार यांनी केला सवाल