दक्षिण गाझामध्ये इस्रायलची लष्करी कारवाई आणि तेथील बिघडत चाललेली मानवतावादी परिस्थिती यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या प्रशासनाने इस्रायलला अब्जावधी डॉलर्सचे बॉम्ब आणि लढाऊ विमानांच्या निर्यातीला गुप्तपणे मान्यता दिली आहे
पॅलेस्टिनी नागरिकांवर परिणाम होण्याची भीती असूनही वॉशिंग्टनने शस्त्रास्त्रांच्या पॅकेजला हिरवा कंदील दिला आहे. इस्त्रायलच्या संरक्षण रणनीतींना अटळ पाठिंबा असल्याचे हे लक्षण आहे. संरक्षण निर्यात मंजुरीमध्ये समाविष्ट केलेल्या शस्त्रांमध्ये 1,800 MK-84 (2,000 पाउंड) बॉम्ब आणि 500 MK-82 (500 पाउंड) बॉम्ब समाविष्ट आहेत. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय, पेंटागॉन आणि परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, पॅलेस्टिनींची भूक भागवण्यासाठी अमेरिका, जपान आणि संयुक्त राष्ट्रे गाझामध्ये खाद्यपदार्थांची पाकिटे सातत्याने टाकत आहेत. रविवारीही खाद्यपदार्थांची पाकिटे टाकण्यात आली.