Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तालिबानमध्ये समलिंगी पुरुषावर बलात्कार, LGBTQ समुदायाचे लोक देखील धोक्यात

Webdunia
बुधवार, 1 सप्टेंबर 2021 (16:32 IST)
अफगाणिस्तानात तालिबानचे आगमन झाल्यानंतर आणि काबूलमधून अमेरिकन सैन्य गेल्यानंतर देशातील जनता दहशतमध्ये आहे. अफगाणिस्तानातील महिला भयभीत आहेत, LGBTQ समुदायाचे लोकही घाबरले आहेत. दरम्यान, बातमी आली की तालिबान्यांनी केवळ एका समलिंगी पुरुषावरच बलात्कार केला नाही तर त्याला मारहाणही केली.
 
अहवालानुसार, एका समलिंगी व्यक्तीला दोन तालिबान लढाऊंनी राजधानी काबूलमध्ये लपण्यासाठी तसेच त्याला देशाबाहेर सुरक्षित मार्ग दाखवण्याचे आमिष दाखवले.
 
पण जेव्हा तो त्यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा समलिंगी माणसाला मारहाण तर केलीच पण त्याच्यावर बलात्कारही केला. एवढेच नाही तर लढाऊंनी नंतर त्याच्या वडिलांचा फोन नंबर घेतला आणि त्यांना सांगतलं की त्यांचा मुलगा समलिंगी आहे.
 
अहवालानुसार, हा खुलासा एका अफगाणी कार्यकर्त्या आर्टेमिस अकबरी यांनी केला, जो आता तुर्कीमध्ये राहतो. अकबरीने एका टीव्ही न्यूजला सांगितले की तो त्या व्यक्तीच्या संपर्कात होता. ते म्हणाले की, तालिबानी राजवटीतील समलिंगी लोकांचे जीवन कसे असेल याचे हे कृत्य सुरुवातीचे उदाहरण आहे.
 
अकबरीप्रमाणे "ते (तालिबान) जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की" आम्ही बदललो आहोत आणि आम्हाला महिलांच्या हक्कांची किंवा मानवी हक्कांची कोणतीही समस्या नाही. "पण, 'ते खोटे बोलत आहेत. तालिबान बदलले नाहीत.' कारण त्यांची विचारधारा बदललेला नाही.
 
तथापि, तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी आग्रह धरला की सुरक्षा दले त्याच्या राजवटीतील लोकांशी "सौम्य आणि चांगले" असतील. त्याच वेळी, अफगाणिस्तानचे समलिंगी लेखक नेमत सादत यांनी पिंक न्यूजशी केलेल्या संभाषणात सांगितले की तालिबान LGBTQ समुदायाच्या लोकांना शोधतात आणि मारतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

सोडा कारखान्याच्या पाइपलाइनमधून क्लोरीन गॅसची गळती

IND U19 vs AUS U19: भारतीय 19 वर्षांखालील संघा कडून ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव

कमला हॅरिसचे ट्रम्प यांना आणखी एका चर्चेचे आव्हान

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती 2024 :थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील माहिती

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुढील लेख
Show comments