Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिकन FDA ची hydroxychloroquine च्या दुष्परिणामांविषयी चेतावणी

american FDA
, मंगळवार, 28 एप्रिल 2020 (13:02 IST)
वाशिंग्टन- अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मलेरियावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या औषधांच्या दुष्परिणामांकडे इशारा दिला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की कोविड 19 सारख्या आजारासाठी हे औषध फायदेशीर आहे. पण या औषधाने हृदयरोग संबंधित गंभीर प्राणघातक समस्या उद्धभवू शकतात. 
 
एफडीएने औषध सुरक्षा संवादात सांगितले की कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत औषध वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. ते म्हणाले की औषधांशी संबंधित या जोखमीचा आधीपासूनच उल्लेख आहे, तरी आरोग्यसेवा कर्मचार्‍यांनी यांकडे बारकाईने लक्ष दिल्यास यावर नियंत्रण करता येऊ शकतं. 
 
एफडीएचे आयुक्त स्टीफन एम. हान यांनी म्हटले की आरोग्य कर्मचारी आपल्या रुग्णांसाठी प्रत्येक संभावी पर्याय बघत आहे आणि आम्ही त्यांना योग्य माहिती पुरवत आहोत ज्याते ते योग्य निर्णय घेऊ शकतील.
 
ते म्हणाले की कोविड 19 च्या उपचारासाठी हे औषधे किती सुरक्षित आणि प्रभावी आहे, हे शोधण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरु आहेत. पण या औषधांच्या दुष्परिणामाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 
 
बऱ्याच अहवालात असे आढळून आले की मलेरियावर उपचार करण्यासाठीचे वापरले जाणारे औषधांचा परिणाम रोगाच्या सुरुवातीसच्या काळात कोरोना विषाणूच्या संक्रमण झालेल्या रुग्णावर होतो पण हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णासाठी हे प्राणघातक आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दात कोरून देश चालवायचा असेल तर अर्थमंत्र्यांची गरज काय? - शिवसेनेचा हल्लाबोल