Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Imran Khan: इम्रान खानवर अटकेची टांगती तलवार ,इस्लामाबाद पोलीस लाहोरला रवाना

Webdunia
मंगळवार, 14 मार्च 2023 (20:17 IST)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांच्या लाहोरमधील निवासस्थानाबाहेर चिलखती पोलिसांची वाहने आली. दरम्यान, इस्लामाबादमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना  अटक करण्याच्या उद्देशाने पोलीस तेथे पोहोचले होते. पीटीआयचे कार्यकर्ते इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर जमू लागले आहेत.
 
एका महिला दंडाधिकाऱ्याला संबोधित करताना धमकी दिल्याप्रकरणी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी आणि इस्लामाबाद पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध धमकीची भाषा वापरल्याबद्दल सोमवारी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले.
 
तोशाखाना प्रकरणात न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल आणि गेल्या वर्षी एका सार्वजनिक सभेत एका महिला न्यायाधीशाला धमकावल्याप्रकरणी अटक वॉरंट बजावण्यात आले होते. इस्लामाबादच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जफर इक्बाल यांनी तोशाखाना प्रकरणाची सुनावणी केली आणि वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश राणा मुजाहिद रहीम यांनी पोलिसांना माजी पंतप्रधानांना अटक करून न्यायाधीशांना धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयात हजर करण्यास सांगितले होते. तोशाखाना प्रकरणात 18 मार्चला आणि न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी इम्रानला 21 मार्चला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते.
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

मुंबईत फेसबुकवर लाईव्ह येऊन तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Bank Holiday In October : ऑक्टोबर मध्ये बँका एकूण 12 दिवस बंद राहणार, यादी पहा

मुंबईत रेल्वे अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक, नऊ लाखांचे नुकसान

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका शिवसेना युबीटी नेते संजय राऊत म्हणाले

ठाण्यातील एका व्यावसायिक इमारतीच्या11 व्या मजल्यावर आग

पुढील लेख
Show comments