पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ 114 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. सरकार स्थापणसाठी काही जागा कमी पडल्यामुळे त्यांना अपक्ष आणि लहान पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे.
सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीलीग-नवाज यांच्या पक्षाला 62 जागा तर माजी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 43 जागा मिळाल्या आहेत. आतापर्यंत 261 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. आणखी 11 निकाल जाहीर होणे बाकी आहेत. अपक्ष उेदवारांनी 12 जागा मिळवल्या आहेत.
इम्रान यांनी कालच माध्यमांशी बोलताना जनतेचा कौल आम्हालाच मिळाला असल्याचा दावा केला होता. तसेच निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
मुताहिद मजलीस-इ-अल या पक्षाने 12 जागा जिंकल्या आहेत. तर पाकिस्तान मुस्लीम लीगने पाच जागांवर विजय मिळविला आहे. मुताहिद कौमी मुव्हमेंटने 6 जागा जिंकल्या आहेत. 342 सदस्य असलेल्या नॅशनल असेंब्लीत इम्रान यांच्या पक्षाचे संख्याबळ 160 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महिलांच्या राखीव 29 जागांचा आणि अल्पसंखकांच्या चार ते पाच जागांचा समावेश आहे. इ्रान खान यांचा त्रिपक्ष असलेल पाकिस्तान मुस्लीम लीग- क्यू या पक्षाने पाच जागा जिंकल्या आहेत. तसेच महिलांची एक राखीव जागाही त्यांच्याकडे आहेत. काही अपक्षांनीही इम्रान यांना पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे इम्रान यांच्याकडे 173 सदस्यांचे पाठबळ आहे.