Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वॉटर पार्कमध्ये स्लाईड तुटून 30 फूट खोल पाण्यात लोक पडले

In the water park
, शुक्रवार, 13 मे 2022 (19:46 IST)
कधी, कोणत्या प्रकारची दुर्घटना घडू शकते हे कोणालाही माहिती नाही. असे अपघात सहसा तेव्हाच होतात जेव्हा आपण अपेक्षा करत नाही. कधी कधी अशा ठिकाणी अपघात होतात, जिथे कल्पनाही करणे कठीण असते. काही दिवसांपासून अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इंडोनेशियातील केनपार्क वॉटरपार्कचा आहे. जिथे अचानक वॉटर स्लाईड तुटून 30 फूट वरून लोक खाली पडून त्यांची हाडे मोडून त्यांना दुखापत झाली. इंडोनेशियातील कांजेरन पार्कमध्ये भीषण अपघात झाला आहे. वॉटरपार्कमध्ये अर्धी स्लाइड संपल्यानंतर लोक 30 फूट पाण्यात पडले. 7 मे रोजी घडलेल्या या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्यूब स्लाइडचा एक भाग कोसळताना दिसत आहे. काँक्रीटच्या फरशीवर पडल्याने पोहणारे ओरडताना दिसत आहे. 
 
रिपोर्टनुसार, स्लाइडमध्ये अडकलेल्या 16 लोकांपैकी 8 लोक गंभीर जखमी झाले आहेत, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन जणांची हाडेही मोडली.  वॉटर पार्क प्रशासनाने सांगितले की, राइड दरम्यानच स्लाइड खराब आणि कमकुवत झाल्यामुळे हा अपघात झाला. वॉटर पार्क व्यवस्थापनाने कळवले की नऊ महिन्यांपूर्वी बहुतेक स्लाइड्सची चाचणी घेण्यात आली होती.
 
या घटनेनंतर सुरबाया शहराच्या उपमहापौरांनी भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी पाहणी करण्याचे सांगितले आहे. या घटनेत जखमी झालेल्या सर्वांवर उपचार आणि काळजी घेतली जाईल, असे महापौर यांनी सांगितले. मात्र, सर्व जखमींची प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
हा व्हिडिओ फेसबुकवर NOODOU नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये लोक खाली पडताना दिसत आहे. स्लाईडच्या बाजूला पडलेला तडा हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. स्लाइड ओव्हरलोड झाल्यामुळे स्लाइड तुटली आणि सर्व खाली पडले. यासोबतच वॉटर पार्कच्या देखभालीवरही प्रश्न उपस्थित झाला आहे. नऊ महिन्यांपूर्वी येथे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तेव्हापासून येथील स्लाइड्सची एकदाही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळेच हा अपघात झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाविकांच्या बसला भीषण आग, चार जणांचा मृत्यू, 22 प्रवासी होरपळले