Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती

international court of justice stays on kulbhushan jadhav
, बुधवार, 10 मे 2017 (11:48 IST)

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक  झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या  शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.

पाकिस्तानने भारताला कोणतीही माहिती न देता बेकायदशीरपणे फाशीची शिक्षा सुनावली, असा दावा भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता.दरम्यान पाकिस्तानकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला आपली बाजू मांडावी लागणार आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धोनीचे ऑफर लेटर ललित मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले!