Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

'गाझामधून हमासचा नायनाट करण्याचं' इस्रायलचं ध्येय, पण हे शक्य आहे का?

israel hamas war
, बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (15:35 IST)
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ठरवलं आहे की, ते 'पश्चिम आशिया बदलून टाकणार', तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही 'आता मागे फिरणं शक्य नाही' असं म्हटलं आहे.
मात्र, इस्रायलचं सैन्य गाझावर हल्ले तीव्र करत असून पॅलेस्टिनींना माघार घेण्याचा इशारा दिला जात असल्यानं हे युद्ध कुठे चाललं आहे आणि पुढे काय होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
7 ऑक्टोबर रोजी हमासनं केलेल्या भीषण हल्ल्यानंतर इस्रायली अधिकारी सातत्यानं सांगत आहेत की त्यांचा उद्देश हमासला लष्करी आणि राजकीय दोन्ही दृष्ट्या गाझामधून हद्दपार करण्याचा आहे.
 
पण आपल्या लष्करी सामर्थ्याचा वापर करण्याव्यतिरिक्त, इस्रायल हे लक्ष्य कसं साध्य करेल, हे स्पष्ट नाही.
 
तेल अवीव युनिव्हर्सिटीच्या मोशे ड्यान सेंटरमधील पॅलेस्टिनियन स्टडीज फोरमचे प्रमुख मायकल मिल्श्टेन सांगतात की, "तुम्ही पुढील योजना न आखता असं ऐतिहासिक पाऊल उचलण्याबद्दल बोलू शकत नाही."
 
इस्रायलची योजना काय आहे?
पाश्चिमात्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की, ते भविष्याबद्दल इस्रायलशी सखोल चर्चा करत आहेत, परंतु अद्याप काहीही स्पष्ट नाही.
 
एका राजनैतिक अधिकाऱ्यानं मला सांगितलं की, "कोणतीही ठोस योजना नाही. तुम्ही एखादी योजना तयार करु शकता, पण ती साध्य करण्यासाठी अनेक आठवडे आणि महिने कुटनीतिक पातळीवर काम करावं लागेल."
 
इस्रायलची लष्करी योजना तर आहे. ते हमासची लष्करी क्षमता नष्ट करण्यापासून ते गाझाच्या मोठ्या भागावर ताबा मिळवू शकतात. याआधीच्या युद्धाचा अनुभव घेतलेल्यांचं म्हणणं आहे की, पण पुढे काय करणार, याचा आराखडाच स्पष्ट नाही.
 
इस्रायलच्या फॉरेन इंटेलिजन्स सर्व्हिसमधील माजी ज्येष्ठ अधिकारी हाइम तोमेर म्हणतात, "आमच्या सैन्यानं माघार घेतल्यानंतर गाझामध्ये काय केलं जाईल यावर आमच्याकडे कोणताही प्रभावी उपाय आहे, असं मला वाटत नाही."
 
हमासचा पराभव झालाच पाहिजे, यावर इस्रायलचे एकमत आहे. 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यानंतर या संघटनेला पुन्हा गाझापट्टीत राज्य करण्याची संधी मिळू नये, असं त्यांचं मत आहे.
 
पण मिल्शटेन सांगतात की, हमास हा एक 'विचार' आहे आणि इस्रायल तो सहजासहजी नष्ट करू शकत नाही.
 
ते सांगतात की, "हे फक्त असं नाही की, तुम्ही 1945 मध्ये बर्लिनमधील राइकस्टागवर झेंडा फडकावला आणि झालं."
 
दुसऱ्या महायुद्धादरम्यान, एका सोव्हिएत सैनिकानं बर्लिनमधील राइकस्टाग इमारतीवर आपला झेंडा फडकवला होता, ज्याला जर्मनीवर सोव्हिएत संघाच्या विजयाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात होतं.
 
'इराकवर अमेरिकन कारवाईसारखी मोहीम'
डॉ. मिल्शटेन यांनी इराकमध्ये 2003 मधील अमेरिकेच्या कृतींप्रमाणेच इस्रायलच्या भूमिकेचं वर्णन केलं आहे.
 
2003 मध्ये, इराकमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्यानं सद्दाम हुसेनच्या राजवटीच्या प्रत्येक खुणा पुसून टाकण्याचा प्रयत्न केला.
 
'डी-बाथिफिकेशन' नावाचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. यामुळे लाखो इराकी सरकारी आणि लष्करी अधिकारी, कर्मचारी बेरोजगार झाले. या परिस्थितीमुळे अराजकता निर्माण झाली होती.
 
त्या इराक संघर्षात सामील असलेले माजी अमेरिकन सैनिक इस्रायलमध्ये आहेत आणि ते फल्लुजाह आणि मोसुलसारख्या ठिकाणांचे अनुभव इस्रायली सैन्यासोबत शेअर करत आहेत.
 
डॉ मिल्शटेन म्हणतात, "मला आशा आहे की त्यांनी इराकमध्ये कोणत्या मोठ्या चुका केल्या हे, ते इस्रायलींना सांगतील."
 
" त्यांनी या भ्रमात राहू नये, जसं की ते सत्ताधारी पक्षांला संपवतील किंवा लोकांचं मत बदलेल. तसं होणार नाही."
 
पॅलेस्टिनी लोकांना काय वाटतं?
डॉक्टर मिल्शटेन यांच्या या विधानाशी पॅलेस्टिनीही सहमत आहेत.
 
पॅलेस्टिनी नॅशनल इनिशिएटिव्हचे अध्यक्ष मुस्तफा बरघुती सांगतात की, "हमास ही तळागाळातील एक लोकप्रिय संघटना आहे. जर त्यांना हमासला हटवायचं असेल तर त्यांना गाझामध्ये नरसंहार करावा लागेल."
 
आणि हा विचार पॅलेस्टिनी लोकांच्या मनात आणखीनच भीती वाढवत आहे की इस्रायलला गाझामधून लाखो पॅलेस्टिनींना हुसकावून लावायचं आहे आणि त्यांना इजिप्तला पाठवायचं आहे.
 
इस्रायलच्या स्थापनेदरम्यान त्यांच्या घरातून हाकलून दिलेले पॅलेस्टिनी गाझामध्येही मोठ्या संख्येनं स्थायिक झाले आहेत.
 
अशा परिस्थितीत गाझामधून या लोकांना पुन्हा मोठ्या प्रमाणावर बाहेर काढणं त्यांना पुन्हा 1948 च्या दु:खद घटनांची आठवण करून देईल.
 
पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या डायना बुट्टू या सांगतात की, "इथून निघणं हे फक्त जायचं तिकीट आहे. मग इथं परतणं शक्य होणार नाही."
 
इस्रायली तज्ज्ञ आणि ज्यात वरिष्ठ अधिकारी ही आहेत ते सांगतात की, सिनाईच्या सीमेवर पॅलेस्टिनींना तात्पुरतं स्थायिक करावं
 
इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदचे माजी प्रमुख गियोरा एइलँड म्हणतात की, जर इस्रायलला निष्पाप पॅलेस्टिनींना न मारता गाझामध्ये आपले लष्करी उद्दिष्ट साध्य करायचं असेल
 
तर त्यांना गाझामधून नागरिकांना बाहेर काढावं लागेल. ते सांगतात की "त्यांना तात्पुरता किंवा कायमचा इजिप्तच्या सीमेत प्रवेश करावा लागेल."
 
भीतीचे वातावरण
20 ऑक्टोबर रोजी जो बायडेन यांनी युक्रेन आणि इस्रायलला मदत करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसकडे निधी मागितला तेव्हा पॅलेस्टिनींची भीती आणखी वाढली.
 
अतिरिक्त निधीची मागणी करताना असं सांगण्यात आलं की, "या संकटामुळे स्थलांतर होईल आणि स्थानिक पातळीवर मदतीची आवश्यकता असेल."
 
पॅलेस्टिनींना सीमा ओलांडण्याची परवानगी देण्याबाबत इस्रायलनं आतापर्यंत काहीही सांगितलेलं नाही.
 
इस्रायलच्या स्थापनेदरम्यान त्यांच्या घरातून हाकलून दिलेले पॅलेस्टिनी गाझामध्येही मोठ्या संख्येनं स्थायिक झाले आहेत.
 
अशा परिस्थितीत गाझामधून या लोकांना पुन्हा मोठ्या प्रमाणावर बाहेर काढणं त्यांना पुन्हा 1948 च्या दु:खद घटनांची आठवण करून देईल.
 
पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनच्या डायना बुट्टू या सांगतात की, "इथून निघणं हे फक्त जायचं तिकीट आहे. मग इथं परतणं शक्य होणार नाही."
 
इस्रायली तज्ज्ञ आणि ज्यात वरिष्ठ अधिकारी ही आहेत ते सांगतात की, सिनाईच्या सीमेवर पॅलेस्टिनींना तात्पुरतं स्थायिक करावं
 
इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदचे माजी प्रमुख गियोरा एइलँड म्हणतात की, जर इस्रायलला निष्पाप पॅलेस्टिनींना न मारता गाझामध्ये आपले लष्करी उद्दिष्ट साध्य करायचं असेल
 
तर त्यांना गाझामधून नागरिकांना बाहेर काढावं लागेल. ते सांगतात की "त्यांना तात्पुरता किंवा कायमचा इजिप्तच्या सीमेत प्रवेश करावा लागेल."
 
भीतीचे वातावरण
20 ऑक्टोबर रोजी जो बायडेन यांनी युक्रेन आणि इस्रायलला मदत करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसकडे निधी मागितला तेव्हा पॅलेस्टिनींची भीती आणखी वाढली.
 
अतिरिक्त निधीची मागणी करताना असं सांगण्यात आलं की, "या संकटामुळे स्थलांतर होईल आणि स्थानिक पातळीवर मदतीची आवश्यकता असेल."
 
पॅलेस्टिनींना सीमा ओलांडण्याची परवानगी देण्याबाबत इस्रायलनं आतापर्यंत काहीही सांगितलेलं नाही.
 
व्याप्त वेस्ट बँकमधील रामल्लाह शहरात स्थित पॅलेस्टिनी प्राधिकरण 'फतह'चं चालवते.परंतु पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि त्यांचे वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास हे वेस्ट बँक आणि गाझा या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या पॅलेस्टिनींना पसंत नाहीत.
 
डायना बुट्टू म्हणतात की पॅलेस्टिनी प्राधिकरणाला शांतपणे गाझाला परत यायला आवडेल, पण इस्रायली टँकवर स्वार होऊन नाही. म्हणजे इस्रायलच्या मदतीनं त्यांना परत यायचं नाही.
 
पॅलेस्टिनी नेता हनान अशरवी या 90 च्या दशकात काही काळ पॅलेस्टिनी प्राधिकरणात होत्या. पॅलेस्टिनी लोकांनी जीवन कसं जगावं हे इस्रायलींसह बाहेरील लोकांना ठरवू देण्याचा, त्या ठामपणे विरोध करतात.
 
त्या म्हणतात की, "ज्यांना वाटतं की हा बुद्धिबळाचा खेळ आहे आणि काही प्यादे इकडे तिकडे हलवून आणि शेवटी तुम्ही चेकमेट कराल, ते चुकीचं आहे."
 
त्या सांगतात की, "तुम्हाला त्यांचं समर्थन करणारे लोक सापडतील, पण गाझाचे लोक त्यांना स्वीकारणार नाहीत."
 
ओलिसांची सुटका करण्याचे प्रयत्न
 
ज्या लोकांनी गाझामधील या पूर्वीची युद्धं पाहिली आहेत, जरी ते आत्ताच्या युद्धासारखं नसलं, जवळजवळ प्रत्येक पद्धती या आधी वापरल्या गेल्या आहेत असं त्यांना वाटतं.
 
मोसादचे माजी अधिकारी हाइम तोमेर म्हणतात की, त्यांना एक महिन्यासाठी लष्करी कारवाई थांबवण्याची इच्छा आहे जेणेकरून ओलिसांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करता येतील.
 
2012 मध्ये ते गाझा युद्धादरम्यान गुप्त चर्चेत भाग घेण्यासाठी मोसादच्या संचालकासह कैरोला गेले होते.
 
या चर्चेनंतर युद्धविरामावर सहमती झाली.
 
ते म्हणतात की, हमासचे प्रतिनिधी चर्चेसाठी रस्त्याच्या पलीकडे उपस्थित होते आणि इजिप्तचे अधिकारी चर्चा पुढे नेण्यासाठी इकडून तिकडे जात होते.
 
ते सांगतात की अशा संवादाचा मार्ग वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण इस्रायलला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.
 
ते सांगतात की, "मला काही हजार हमास कैद्यांची सुटका करण्याची चिंता नाही. मला माझे लोक घरी परत आलेले पाहायचे आहेत."
 
ते म्हणतात की, "ओलिसांची सुटका केल्यानंतर, इस्रायल पूर्ण ताकदीनिशी लष्करी कारवाया करण्याचा किंवा दीर्घकालीन युद्धविराम करण्याचा विचार करू शकतो."
 
मोसादचे माजी अधिकारी हाइम तोमेर म्हणतात की, गाझाला इस्रायलपासून वेगळं करून भूमध्य समुद्रात नेलं जाऊ शकत नाही. अशा स्थितीत इस्रायलला गाझाशी नेहमीच संघर्ष करावा लागणार आहे.
 
ते सांगतात की "हे आमच्या गालात अडकलेल्या एका हाडासारखं आहे."
 











Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पॅलेस्टिनी महिला मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या का घेत आहेत?