इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिनाभराहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. संघटना - सन्स ऑफ अबू जंदाल यांनी सोमवारी पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांना इस्रायलविरुद्ध संपूर्ण युद्धाची घोषणा करण्यासाठी 24 तासांचा अवधी दिला होता. या धमकीनंतर मंगळवारी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अध्यक्ष अब्बास यांच्या हत्येचा कथित प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये महमूद अब्बास यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर गोळीबार होताना दिसत आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या ताफ्यावर ताबडतोब गोळीबारी केली.या हल्ल्यात पेलेस्टिनीं राष्ट्राध्यक्ष बचावले. अब्बासच्या ताफ्यातील एका अंगरक्षकाला अचानक गोळी लागल्याने तो खाली पडल्याचे स्पष्टपणे दिसून येते. यानंतर उर्वरित अंगरक्षक हल्लेखोरांशी लढताना दिसले.
अब्बास यांच्या ताफ्यावर झालेल्या गोळीबारात एका अंगरक्षकाला गोळी लागली होती. सन्स ऑफ अबु जंदाल ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या महिनाभराहून अधिक काळ संघर्ष सुरू आहे. गाझा पट्टीत इस्त्रायली हल्ले थांबवण्याची मागणी सध्या बहुतांश देश करत आहेत. त्याचबरोबर काही इस्लामिक संघटना आणि दहशतवादी या युद्धातून आपले हित साधण्यात व्यस्त आहेत.