इस्त्रायलने लेबनॉनच्या ईशान्येकडील कृषी गावांवर केलेल्या डझनभर भीषण हवाई हल्ल्यात 52 लोक मारले गेले, तर लेबनॉनमधूनही इस्रायलवर रॉकेटने केलेल्या हल्ल्यात 11 लोक जखमी झाले. युद्धविरामाची शक्यता कमी होताच दोघांमध्ये अनेक हल्ले झाले. लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात 72 लोक जखमी झाले आहेत.
दरम्यान, मध्य गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्रायलच्या ताज्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या 25 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सप्टेंबरपासून इस्रायली सैन्य आणि लेबनीज हिजबुल्लाह गट यांच्यातील लढाई दरम्यान युद्धविरामासाठी अमेरिकेचा दबाव देखील कमी झाला आहे.
लेबनॉनमधून सोडण्यात आलेले रॉकेट इस्रायलच्या तिरा शहरात पडले. एका इमारतीबाहेर काही मुले आणि महिला आरडाओरडा करताना दिसल्या. येथे इमारतीच्या आत अनेक लोक होते, त्यापैकी 11 जण जखमी झाले आहेत.