Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इस्रायलचा गाझा पट्टीत हल्ला, पॅलेस्टिनियन कमांडरसह 8 जणांचा मृत्यू

Israeli forces attacked some places in the Gaza Strip. Marathi International News In Webdunia Marathi
, शुक्रवार, 5 ऑगस्ट 2022 (22:41 IST)
इस्रायलनं गाझा पट्टीतल्या काही भागांवर हल्ला केला आहे.पॅलेस्टिनियन कट्टरतावादी गटाकडून मिळालेल्या धमकी मिळाल्यानंतर उत्तरादाखल इस्रायलच्या सैन्यानं गाझा पट्टीतल्या काही ठिकाणांवर हल्ला केला, अशी माहिती इस्रायलच्या लष्करानं दिलीय.गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या या हल्ल्यात किमान आठ पॅलेस्टिनियन नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहाद (PIJ) चे चार सदस्य मारले गेल्याची माहिती मिळते आहे. या चारजणांमध्ये पीआयजेचा कमांडर तायसीर जबारीचा मृत्यू झाल्याचं स्थानिक आरोग्य विभागानं सांगितलं.
 
गाझास्थित पीआयजेने मध्य इस्रायलवर बॉम्बहल्ले करून प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. इस्रायलचे पंतप्रधआन यायर लॅपिड यांनी म्हटलं की, "इस्रायल दहशतवादी संघटनांना त्यांचा अजेंडा ठरवण्याची मुभा देणार नाही."
 
ते पुढे म्हणाले की, "जो कुणी इस्रायलला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू. आमचे सुरक्षारक्षक इस्लामिक जिहाद दहशतवाद्यांविरोधात कारवाई करतील. कारण इस्रायलच्या नागरिकांना धोक्यापासून दूर ठेवायचं आहे."
 
इस्रायलच्या संरक्षण दलानं म्हटलंय की, "पीआयजेशी संबंधित ठिकाणांवर हल्ला करत आहोत. यात गाझा शहरातील पॅलेस्टिनियन टॉवरचाही समावेश आहे. तिथं एक स्फोट झाला आहे."
 
नुकतेच इस्रायलने गाझाच्या सीमेवर राहणाऱ्या लोकांसाठी सुरक्षाव्यवस्था कडेकोट केली होती. रस्ते बंद करण्यात आले होते.
 
पीआयजे इराणद्वारा समर्थित आहे आणि त्यांचं मुख्यालय सीरियामध्ये आहे.
 
गाझामधील सर्वात कट्टरतावादी संघटनांपैकी एक पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहाद (पीआयजे) ही संघटना आहे. इस्रायलविरोधात गोळीबारासह अनेक हल्ल्यासाठी पीआयजेला जबाबदार मानलं जातं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bajrang Punia Wins Gold:बजरंग पुनियाने कुस्तीमध्ये कॅनडाच्या कुस्तीपटूचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले