Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तानाच्या माजी मंत्र्यांवर आली डिलिव्हरी बॉय बनण्याची वेळ, फोटो व्हायरल

Webdunia
बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (14:47 IST)
अफगाणिस्तान तालिबानने काबीज केल्यावर सामान्य नागरिकच काय सत्तेच्या शिखरावर बसलेल्या राजनेत्यांना ही देश सोडून जाण्यास भाग पाडले आहे.राष्ट्रपती अशरफ गनी देखील सध्या यूएईच्या आश्रयामध्ये आहेत.आज आम्ही आपल्याला अफगाणिस्तानच्या माजी संचार मंत्र्यांबद्दल सांगणार आहोत, जे एकेकाळी सूट-बूट घालायचे आणि आजूबाजूला सुरक्षिततेखाली राहायचे, परंतु सध्या परिस्थिती इतकी बदलली आहे की आता ते जर्मनीच्या रस्त्यावर पिझ्झा डिलिव्हरीबॉय चे काम करताना दिसत आहेत.अल जझीरा अरबी या वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवरून अफगाणिस्तानचे माजी आयटी मंत्री सय्यद अहमद शाह सादत यांची छायाचित्रे ट्वीट केली आहेत आणि सांगितले आहे की ते आता जर्मनीच्या लीपजींग मध्ये सायकल वरून पिझ्झा डिलिव्हरी करण्याचे काम करत आहेत. सय्यद यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 
 
जर्मन मीडिया रिपोर्ट्सनुसार, सादत आता जर्मनीच्या ''लीफरांदो नेटवर्क' साठी काम करत आहे आणि ते जर्मनच्या लिपझिंग शहरात सायकलद्वारे लोकांना पिझ्झा डिलिव्हर करत आहे. 
 
मात्र, सादत यांनी गेल्या वर्षी अफगाणिस्तानच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.ते 2018 पासून कॅबिनेट मंत्री होते परंतु अफगाणिस्तानच्या गनी सरकारशी मतभेद झाल्यानंतर 2020 मध्ये त्यांनी राजीनामा दिला.राजीनामा दिल्यानंतर ते जर्मनीला गेले आणि तिथेच राहू लागले. 
 
याआधी ते  2005 ते 2013 पर्यंत अफगाणिस्तानमधील संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्र्याचे मुख्य तांत्रिक सल्लागार यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते.सादत यांनी 2016 ते 2017 या कालावधीत लंडनमध्ये एरियाना टेलिकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र सरकारने शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली,बाल सुरक्षा आणि जागरूकतेवर भर दिले

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उद्घाटन

अनिल देशमुख यांनी बनावट शिक्षक भरतीवरून सरकारवर हल्लाबोल केला

अमित शहांनी फोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस! संजय राऊत यांची पुन्हा अमित शहांवर टीका

पुढील लेख
Show comments