अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर' असल्याचे निदान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कॅन्सर त्याच्या हाडांमध्ये पसरला आहे. बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरचा एक आक्रमक प्रकार असल्याचे निदान झाले आहे. जो बायडेन यांच्या कार्यालयानेही याची पुष्टी केली आहे. जो बायडेन यांच्या शरीरातील हाडांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर पसरला आहे, असे बायडेन यांच्या कार्यालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे.
जो बायडेन यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रोस्टेट नोड्यूल आढळल्यानंतर गेल्या आठवड्यात डॉक्टरांनी जो बायडेन यांना तपासले. यानंतर, शुक्रवारी त्यांना प्रोस्टेट कॅन्सरचे निदान झाले. जो बायडेन यांच्या शरीरातील हाडांमध्ये कर्करोगाच्या पेशी पसरल्याचे तपासात समोर आले आहे. बायडेन यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की हा आजाराचा अधिक आक्रमक प्रकार आहे.
Edited By- Dhanashri Naik