आता 'ती' ऐतिहासिक भेट होणार आहे. कारण उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने सिंगापूर परिषदेत भेट व्हावी यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर हात जोडून आणि गुडघे टेकून भीक मागितली असा खुलासा ट्रम्प यांचे वकील रुडी गिऊलियानी यांनी केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, जेव्हा ट्रम्प यांच्या कडक स्वभावासमोर किम जोंग उन पुर्णपणे झुकला तेव्हाच ट्रम्प या बैठकीसाठी तयार झाले. तेल अवीव येथे एका कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांचे वकील रुडी गिऊलियानी यांनी हा खुलासा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अद्याप उत्तर कोरियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
आता ही बैठक होत आहे. व्हाईट हाऊसने सिंगापूरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून, तयारी सुरु असल्याचं सांगितलं आहे.