Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेतील शिकागोमध्ये गोळीबार, ४ जण ठार, १४ जण जखमी

Webdunia
गुरूवार, 3 जुलै 2025 (19:23 IST)
अमेरिकेतील शिकागोमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला आहे. गोळीबारादरम्यान रेस्टॉरंटबाहेर उभ्या असलेल्या गर्दीला लक्ष्य करण्यात आले. गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमीही झाले आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील शिकागो शहरातील एका रेस्टॉरंटबाहेर बुधवारी रात्री झालेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १४ जण जखमी झाले आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की गोळीबारात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळीबाराची ही घटना बुधवारी रात्री उशिरा शिकागोच्या रिव्हर नॉर्थ भागात घडली.
ALSO READ: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना एका रेस्टॉरंटबाहेर घडली, जिथे एका गायकाची अल्बम रिलीज पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की कोणीतरी रेस्टॉरंटबाहेर उभ्या असलेल्या गर्दीवर गोळीबार केला आणि लगेचच वाहनातून पळून गेला. पोलिसांनी सांगितले की सध्या कोणालाही ताब्यात घेतले गेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. संशयिताला पकडण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे.
ALSO READ: दिशा सालियानची आत्महत्याच; पोलिसांचा दावा
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृपक्षात पितरांसाठी खीर आणि उडदाच्या डाळीचे वडे का बनवले जातात?

जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध करता येते का? स्वतःचे श्राद्ध कधी करावे

पितृपक्ष 2025: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचा योग, श्राद्ध विधी कधी करावे हे जाणून घ्या

डोक्याला मेंदी लावण्याचे 5 सौंदर्य फायदे जाणून घ्या

सावधगिरी बाळगा! या 7 चुकांमुळे तुमची हाडे कमकुवत होत आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब!

पाकिस्तानची बनावट टीम, 22 जणांना अटक

न्युड पार्टीच्या पोस्टरमुळे एकच खळबळ

सोन्यात घसरण सुरुच, चांदीही स्वस्त

पुढील लेख
Show comments