Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलीच्या लग्नासाठी वडिलांची घोषणा ऐकून मुलांची रांग लागली

international news
मुलीच्या लग्नाचे स्वप्न बघत त्यासाठी तयारी हे प्रत्येक आई-वडील तिच्या लहानपणापासून करत असतात. या प्रकारेच एक वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी एक आगळीवेगळी घोषणा केली आहे. घोषणा ऐकून मागण्या येत आहे. कारण अट इतकी मोहक आहे की कुणीही संधी सोडणार नाही.
 
हे प्रकरण थायलंड येथील आहे. येथील एका लखपती वडिलांना आपल्या मुलीच्या विवाहाची एवढी काळजी लागली की त्यांनी मुलीशी लग्न करणार्‍याला 2 कोटी रुपये देण्याची घोषणा करून दिली. 
 
रिपोर्टप्रमाणे आरनॉन रोडथॉन्ग नावाचा हा लखपती व्यक्ती आपल्या मुलीच्या लग्नाविषयी इतका चिंतित होता की त्याने मुलगी कार्नसिता हिच्याशी लग्न करणार्‍याला 10 मिलियन थाई बहट (सुमारे 2 कोटी रुपये) देण्याचे घोषित केले.
 
केवळ मुलगा मेहनती असावा, पैसा कमावू इच्छित असावा आणि मुळीच आळशी नसावा. तसेच मुलाकडे डिग्री नसली तरी हरकत नाही परंतू लिहिणे आणि वाचणे येत असावे. रोडथॉन्गकडे डूरियनचे शेत आहे, हे सर्वात महाग आणि घाण वास असणार्‍या फळांमधून एक आहे. या कामात त्याची मुलगी मदत करते. रोडथॉन्गला आपल्या मुलीसाठी असा नवरा पाहिजे ज्याने तिचं काम सांभाळायला हवे.
 
खरं तर, थायलंडमध्ये मुलाकडून हुंडा घेण्याची परंपरा आहे परंतू रोडथॉन्ग स्वत: मुलीच्या लग्नासाठी 2 कोटी रुपये देण्यासाठी तयार असल्यामुळे अट काही कठिण नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विमानतळावर मुलाला विसरली महिला, विमान परत आलं