कॅनडा येथील धर्मगुरू तहिरुल कादरी यांच्या सहत्यांच्या 14 समर्थकांच्या हत्या केल्याच्या प्रकरणी सुनावणी घेण्यात यावी, यासाठी मागणी करणारी याचिका दहशतवादविरोदी न्यायालयाने फेटाळली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यासह त्यांचा भाऊ पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज शणीफ आणि अन्य काहींचा या गुन्ह्यात समावेश असल्याचे बोलले जाते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवाझ शरीफ यांना दिलासा मिळाला आहे. या गुन्ह्यात शरीफ बंधूंबरोबच पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान आणि सरंक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांच्यासह इतर 12 उच्च पदस्थ सरकारी अधिकार्यांवर लाहोर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.