भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये पोलिसांनी सुमारे दोन डझन भारतीय नागरिकांवर कठोर कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ पोलिसांनी एकाच वेळी 23 भारतीय नागरिकांना अटक केली आहे. हिमालयीन देश नेपाळच्या पोलिसांनी सोमवारी मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांना अटक केली.
नेपाळ पोलिसांनी देशाच्या बागमती प्रांतात 23 भारतीय नागरिकांना अटक केली आहे. नेपाळ पोलिसांनी या भारतीय नागरिकांवर ऑनलाइन जुगार रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे.काठमांडूच्या उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बुढानिलकंठ नगरपालिकेतील एका दुमजली इमारतीतून त्यांना अटक करण्यात आले आहेत.
गुप्तचर माहितीच्या आधारे त्यांनी इमारतीवर छापा टाकल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. इमारतीतून 23 भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, भारतीय नागरिकांकडून 81 हजार रुपये रोख, 88 मोबाईल फोन आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या भारतीय नागरिकांवर जुगार विरोधी कायद्याअंतर्गत आरोप लावले आहेत.