स्वीडनच्या स्वंते पाबो यांना फिजिओलॉजी किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. विलुप्त होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या अनुवांशिक (जीनोम) संबंधित शोधांसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी कोरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये विजेत्याची घोषणा केली.
"कोरोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल समितीने आज नामशेष होमिनिन आणि मानवी उत्क्रांतीच्या जनुकांशी संबंधित शोधांसाठी 2022 चे शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे," नोबेल समितीने एका निवेदनात म्हटले आहे.
पाबो हे पॅलेओजेनेटिक्सच्या संस्थापकांपैकी एक आहेत ज्यांनी निएंडरथल जीनोमवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. ते जर्मनीतील लीपझिंग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर इव्होल्यूशनरी एन्थ्रोपोलॉजी येथे मेंजेनेटिक्स विभागाचे संचालक देखील होते.