ganesh chaturthi

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लादेन ऐकायचा उदित नारायण, कुमार सानू ,अलका याज्ञिक यांची गाणी

osama bin laden udit narayan
, शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017 (16:54 IST)

ओसामा बिन लादेनच्या घरी सापडलेल्या कॉम्प्युटरमध्ये  उदित नारायण, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या गाण्यांचा संग्रह  सापडला आहे. मे 2011 मध्ये पाकिस्तानच्या ऐबटाबादमध्ये लपून बसलेल्या अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याला अमेरिकेच्या सैन्यांनी ठार केलं होतं. ओसामा राहायचा त्याठिकाणी अमेरिकी कमांडोजना अनेक कॉम्प्युटर सापडले आहेत. अमेरिकेची गुप्तचर संघटना सीआयएने या कॉम्प्युटरमध्ये असणा-या जवळपास चार लाख 70 हजार फाईल्सना सार्वजनिक केलं आहे. 

ओसामाच्या ठिकाणावरुन सीआयएला जवळपास 18 हजार कागदपत्रांची फाईल, 80 हजार ऑडिओ आणि इमेज फाईल सापडल्या होत्या. याशिवाय लादेनकडे अजय देवगन आणि काजोलच्या  ‘प्यार तो होना ही था’ चित्रपटातील ‘अजनबी मुझको इतना बता’, सलमान खान आणि माधुरी दिक्षितच्या ‘दिला तेरा आशिक’ चित्रपटाचं टायटल साँगही सापडलं आहे. तसंच ‘टॉम अॅण्ड जेरी’ कार्टूनही कॉम्प्युटरमध्ये सापडलं आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअॅप सेवा बंद पडली