पाकिस्तानी हवाई दलाचे एक जेट विमान कोसळून पायलट ठार झाल्याची माहिती एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. नेहमीच्या सरावाच्या उड्डाणादरम्यान तांत्रिक दोषामुळे हे जेट विमान पंजाब प्रांतातील मियानवालीच्या सब्जरार भागात कोसळल्याचे आणि त्यातील पायलट ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री उशिरा हा अपघात झाला असून अपघाताचे ठिकाण लाहोरपासून 250 किमी अंतरावर आहे.
पाकिस्तानी हवाई दलाच्या मीडिया विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार विमान कोसळण्यापूर्वी पायलट विंग कमांडर महंमद शाहजाद विमानाबाहेर पडू शकला नाही. पायलटचा मृतदेह शोधून पाकिस्तानी हवाई दलाच्या एमएम आलम या तळावर नेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती हवाई दलाने दिली आहे.