Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची कोरोना चाचणी, रुग्णांचा आकडा 10000 वर

Pakistan PM Imran Khan Covid test result
, गुरूवार, 23 एप्रिल 2020 (11:45 IST)
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या कोरोना चाचणीचा परिणाम सरकारने जाहीर केला असून त्यांची रिर्पोट निगेटिव्ह आल्याची माहीत आरोग्यमंत्री झफर मिर्झा यांनी दिली. येथील स्वयंसेवी संघटना इधी फाउंडेशनच्या प्रमुखांनी इम्रान खान यांची भेट घेतली होती नंतर त्यांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तेव्हापासून ते आयसोलेशनमध्येच राहत होते. मास्कचा वापर न करता इम्रान यांनी केलेली ही भेट सुमारे 7 मिनिटे चालली होती.
 
तसेच पंतप्रधान यांच्या कुटुंबाच्या चाचणी रिर्पोटमध्ये देखील संक्रमणाची पृष्टि नसल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
पंतप्रधानांना भेटल्यानंतर फैसल यांना बरे वाटले नसल्याचे ‘डॉन’ वृत्त पत्रात सांगण्यात आले होते. त्यांचा मुलगा साद इधी म्हणाले की त्यांना काही लक्षणे दिसू लागली मा‍त्र पुढील चार दिवसानंतर ही लक्षणे कमी होऊ लागली. मात्र कोरोना तपासणीसाठी नमुना पाठविण्यात आला तेव्हा परिणाम पॉझिटिव्ह आहे. ते घरातच क्वारंटाईमध्ये असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितले.
 
दरम्यान पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या 10 हजारांच्या जवळपास पोहचली आहे. या आजारामुळे आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील पंजाब प्रांतात सर्वाधिक 4331 प्रकरण, सिंधमध्ये 3373, खैबर-पख्तूनख्वामध्ये 1345, बलूचिस्तानमध्ये 495, गिलिगिट बाल्टीस्तानमध्ये 283, इस्लामाबादमध्ये 194 प्रकरण असल्याचे समोर आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉकडाउनचा फायदा: मुंबई लोकल प्रवास आता अधिक सुरक्षित