Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तान रेल्वे अपघात : आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जण जखमी

Pakistan Railway Accident: 40 dead till now
, सोमवार, 7 जून 2021 (16:26 IST)
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील डहरकीजवळ सर सैय्यद एक्स्प्रेस आणि मिल्लत एक्स्प्रेस एकमेकांना धडकल्या आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे ,तर 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
 
रेडियो पाकिस्तानानं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (7 जून) पहाटे ही घटना घडली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे तर रेल्वेच्या डब्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
 
रेल्वेच्या माहितीनुसार, मिल्लत एक्सप्रेस कराचीहून सरगोधा आणि सैय्यद एक्सप्रेस रावळपिंडीहून कराचीला जात होती. दुर्घटनेनंतर मिल्लत एक्सप्रेसचे 8 आणि सर सैयद एक्सप्रेसचे इंजीनसहित तीन डब्बे पटरीहून खाली उतरले. तर काही डबे दरीत पडले. घोटकी भागातल्या डहरकी जवळ ही घटना घडली असून या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.
 
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्वीट करत म्हटलं, घोटकी इथं झालेल्या घटनेमुळे मला हादरा बसरला आहे. या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांना निर्देश दिले आहेत. याप्रकरणी रेल्वे सुरक्षेतील दोष शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहोत.
 
घोटकीचे उपआयुक्त उस्मान अब्दुल्लाह यांनी जियो न्यूजला सांगितलं की, मदतकार्यासाठी मोठमोठ्या मशीन्सची गरज आहे आणि त्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार