Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लंडनमध्ये कबाब चोरताना पकडली गेली पाकिस्तानी तरुणी ! व्हिडिओ व्हायरल

Pakistani origin girl in London caught  stealing Kebabs from a shop
, बुधवार, 17 एप्रिल 2024 (15:32 IST)
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन मुलींना एका दुकानाला कुलूप लावून कोंडले आहे. त्या बाहेर पडण्यासाठी आवाज करत आहे. बाहेर उभे असलेले काही लोक व्हिडिओ बनवत आहेत आणि थट्टा करत आहेत. हा व्हिडीओ लंडनचा असून त्यात दिसत असलेल्या मुली पाकिस्तानातील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार कथितपणे लंडनमधील एका दुकानात कबाब चोरल्याच्या आरोपाखाली मुलीला कोंडण्यात आले.
 
कबाब चोरताना मुली पकडल्या
व्हायरल व्हिडिओनुसार, दोन्ही मुली एका दुकानातून कबाब चोरून पळ काढत होत्या, त्यानंतर त्या दुसऱ्या दुकानात शिरल्या. मात्र दुकान मालकाला संशय आल्याने त्यांनी दुकानाला कुलूप लावले. यानंतर दोन्ही मुली दुकानात आरडाओरडा करताना दिसतात.
 
व्हिडिओमध्ये दोन्ही मुली ओरडत आहेत आणि पोलिसांना बोलवायला सांगत आहेत. कबाब चोरल्यानंतर दोघेही दुसऱ्या दुकानात शिरल्या मात्र दुसऱ्या दुकानाच्या मालकाने त्या चोरी करुन आल्याचे समजले म्हणून दुकानदाराने मुलीला त्याच्या दुकानात बंद केले.
 
दुकानाबाहेर उभ्या असलेल्या लोकांनी मुलींचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओबाबत लोकांकडून विविध प्रकारच्या कमेंट येत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मोदी लाट आहे अशा भ्रमात राहू नका'... भाजपचे उमेदवार नवनीत राणा त्यांच्याच वक्तव्यामुळे अडचणीत