न्यूयॉर्कमध्ये एका वृत्तवाहिनीतील नेटली पास्कक्व्रेला ही महिला अँकर लाईव्ह चर्चासत्राचे सूत्रसंचालन करत होती. या लाईव्ह कार्यक्रमात तिच्या पोटात अचानक कळा येऊ लागल्या. नेटली ही गर्भवती होती.
ट्विटरची वाढविलेली शब्दमर्यादा असा या चर्चेचा विषय होता. तिला लाईव्ह टेलिकास्ट सुरु असताना लेबर पेन सुरु झाले. मात्र, आपला शो संपेपर्यंत ती काहीच करु शकत नव्हती. विशेष म्हणजे तिने पुढील काही वेळ या कळा अशाच हसतमुख चेहऱ्याने सहनही केल्या. ब्रेकमध्ये तिने आपल्या सहकाऱ्याला कळा येत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी तिला रुग्णालयात नेले. अखेर १३ तासांच्या उपचारानंतर तिने गोंडस मुलाला जन्म दिला.