Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकारचा मार्ग मोकळा, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला

श्रीलंकेत सर्वपक्षीय सरकारचा मार्ग मोकळा, पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला
, शनिवार, 9 जुलै 2022 (19:38 IST)
Ranil Wickremesinghe resigns: श्रीलंकेतील गृहयुद्धादरम्यान पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.तातडीच्या बैठकीत त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.त्याला मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले.पंतप्रधान विक्रमसिंघे म्हणाले की, त्यांच्या राजीनाम्यामुळे देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
आर्थिक संकटाचा सामना करत असलेला श्रीलंका सध्या गृहयुद्धाच्या भीषण टप्प्यातून जात आहे.पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.महिंद्र राजपक्षे यांच्यानंतर त्यांनी अलीकडेच देशाची सूत्रे हाती घेतली. दुसरीकडे, यापूर्वी कोलंबोमध्ये हजारो आंदोलकांनी पोलिस बॅरिकेड्स तोडले आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर कब्जा केला.22 दशलक्ष लोकसंख्येचे राष्ट्र असलेल्या श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीचा अंदाज यावरून लावता येतो की, राष्ट्रपती गोयबाया यांनी राजपक्षे कुटुंबासह राष्ट्रपती भवन सोडले आहे.एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये श्रीलंकन ​​मीडिया दावा करत आहे की सरकारी कर्मचारी नौदलाच्या जहाजात राष्ट्रपतींचे सूटकेट ठेवत आहेत.ते सध्या कुठे आहेत याचा खुलासा झालेला नाही.
 
रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असला तरी, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे केव्हा पद सोडतील याबाबत अजूनही शंका आहे . आंदोलक राजपक्षे यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत.पण, ते स्वत: कुठे आहे, हे माहीत नाही.राष्ट्रपतींना वाचवण्यासाठी त्यांना गुप्त ठिकाणी ठेवण्यात आल्याचा दावा सुरक्षा सूत्रांनी केला आहे.राजपक्षे यांनी राजीनामा देण्याचे बोलले पण, ते आतापर्यंत सत्तेत आहेत.
 
विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्यापूर्वी श्रीलंकेतील सर्वपक्षीय सरकारने तातडीची बैठक बोलावली.ज्यामध्ये त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची ऑफर दिली होती.या ऑफरनंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्यानंतर देशात सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी कोणती पावले उचलली जातात, हे पाहणे बाकी आहे
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ENG 2nd T20I: रोहित शर्मा ऋषभ पंतसह सलामीला मैदानात, इंग्लंडमध्ये दोन बदल आणि टीम इंडियामध्ये चार बदल