Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे निकटवर्तीय कोरोना संक्रमित, स्वत: ला आइसोलेट केले

Russia President
मॉस्को , मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (18:19 IST)
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर, पुतीन यांनी खबरदारी म्हणून स्वत: ला आइसोलेट (Self-Isolate)  केले. क्रेमलिनने मंगळवारी सांगितले की पुतीन त्यामुळे प्रादेशिक सुरक्षा बैठकांसाठी या आठवड्यात ताजिकिस्तानला जाणार नाहीत.
 
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सीएनएनला ही माहिती दिली. क्रेमलिनने सांगितले की अलीकडेच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निकटवर्तीयांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. त्यानंतर पुतीन राष्ट्रपती भवनातच सेल्फ-आयसोलेशनमध्ये आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Engineers Day 2021: 15 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो अभियंता दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व