सौदी अरेबियाच्या नैऋत्य भागात सोमवारी प्रवाशांनी भरलेल्या बसला अपघात होऊन 20 जणांचा मृत्यू झाला. सौदी अरेबियाच्या राज्य माध्यमांनी सांगितले की, अपघातात इतर 29 लोक जखमी झाले आहेत. मृतांपैकी बहुतेक यात्रेकरू होते जे रमजानच्या पवित्र महिन्यात उमराह (इस्लाममधील तीर्थयात्रेचा एक प्रकार) करण्यासाठी मक्का शहरात जात होते.
पुलावर आदळून पालटल्यानंतर बसने पेट घेतला. या घटनेचे फुटेज टीव्हीवर प्रसारित झाले असून, त्यात बस पूर्णपणे जळालेली दिसत आहे. येमेनच्या सीमेला लागून असलेल्या नैऋत्य असीर प्रांतात वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना रमजानच्या पहिल्या आठवड्यात घडली. जेव्हा बरेच लोक रमजानच्या पवित्र महिन्यात कुटुंब आणि मित्रांसह रात्रीच्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी प्रवास करतात.