Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक !उंदरांचा 6 महिन्याच्या बाळावर हल्ला

Webdunia
शनिवार, 23 सप्टेंबर 2023 (13:25 IST)
इंडियानामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 6 महिन्यांच्या बाळाला उंदरांच्या टोळीने जिवंत चावले. मुल त्याच्या पाळण्यात आरामात झोपले होते. त्यानंतर उंदरांनी त्याच्यावर हल्ला केला. असे सांगितले जात आहे की उंदरांनी मुलाचा 50 पेक्षा जास्त वेळा चावा घेतला आणि इतकेच नव्हे तर त्याचे शरीर देखील कुर्तडले. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळ रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने पालकांना ही घटना कळली.
 
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार ही घटना बुधवारी घडली. जेव्हा मुलाचे आई-वडील डेव्हिड आणि एंजल शोनाबॉम आपल्या मुलाला भेटायला गेले तेव्हा ते चक्रावून गेले. त्यांच्या मुलाला सतत रक्तस्त्राव होत असल्याचे त्यांनी पाहिले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळ गाठून दोन्ही पालकांना ताब्यात घेतले. मुलाची योग्य काळजी न घेतल्याचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांवर केला जात आहे. या घटनेतील आरोपींमध्ये आई-वडिलांशिवाय मुलाची मावशी डेलानिया थुरमन हिचेही नाव आहे. याच घरात राहणाऱ्या डेलानियालाही पोलिसांनी अटक केली आहे.
 
मुलाच्या शरीरातून रक्त वाहत होते
 रिपोर्टनुसार, मुलाच्या गाल, नाक, कपाळ, पाय, हात, मांड्या, हात आणि पायाची बोटे यावर उंदीर चावल्याच्या अनेक खुणा होत्या, त्यातून खूप रक्त वाहत होते. पोलिसांनी सांगितले की, उंदरांनी मुलाचा उजवा हात कोपरापर्यंत चावला होता. त्याच्या बोटांच्या काही भागालाही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे हाडे बाहेर आली होती. या घटनेनंतर, मुलाला ताबडतोब इंडियानापोलिस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला रक्त दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  हे कुटुंब ज्या घरात राहत होते त्या घरात अस्वच्छता होती. संपूर्ण घर कचरा आणि उंदरांनी भरलेले होते. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मार्चमध्ये उंदरांमुळे हा त्रास सुरू झाला. या पूर्वी देखील उंदरांनी मुलांचा चावा घेतला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

हाथरसमध्ये भीषण अपघात, मॅक्स आणि रोडवेज बसमध्ये भीषण टक्कर, 15 जणांचा मृत्यू

मुंबईहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्बची बातमी, तुर्की मध्ये इमर्जन्सी लँडिंग

मलाही राजकारणात येण्याची ऑफर आली, पण साक्षी मलिकचे वक्तव्य

घरातील ज्येष्ठ महिलेला दरवर्षी 18000, 2 उज्ज्वला सिलिंडर मोफत

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर दहशतवाद्यांनी रॉकेट डागले, एकाचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी

पुढील लेख
Show comments